Pimpri Chinchwad News : पिंपरी : भारत देश स्वतंत्र होऊन तो आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी व्हावा या ध्येयानेच क्रांतिकारकांनी जुलमी ब्रिटिश सरकारचा छळ सोसला, प्रचंड त्याग केला, हौतात्म्य पत्करले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दमदार नेतृत्वाखाली क्रांतिकारकांच्या याच ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न होत आहेत. भाजपा त्यासाठी कटिबद्ध असल्याने दिवसेंदिवस ही प्रक्रिया अधिक गतिमान होत आहे, असे प्रतिपादन भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड येथे केले. (Pimpri Chinchwad News)
थोर शूर नरवीरांनी पिंपरी चिंचवडची भूमी पावन झाली
क्रांतिदिना निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी आमदार उमाताई खापरे, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, माजी पक्षनेते नामदेव ढाके आदी मान्यवर उपस्थित होते.
जगताप पुढे म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या थोर शूर नरवीरांनी पिंपरी चिंचवडची भूमी पावन झाली आहे. ज्यांच्या अफाट शौर्याने, हौतात्म्याने उभा भारत स्वातंत्र्य संग्रामासाठी पेटून उठला असे वीर चापेकर बंधु या भूमीत जन्मले, वाढले आणि मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी याच भूमीत अफाट शौर्य गाजवित सुळावर गेले. (Pimpri Chinchwad News)
सूर्य चंद्र असे पर्यन्त आपल्या देशभक्तीचा चिरंतन ठसा उमट वणाऱ्या या महान विभूति आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव कायम राहतीलच. मात्र क्रांतिदिनाचे औचित्य साधून चापेकर बंधु, क्रांतिवीर लहुजी वस्ताद, बिरसा मुंडा आदि थोर विभूतीना अभिवादन अंगावर शहारे तर आलेच. मात्र त्यांनी ज्या स्वराज्याचे स्वप्न पहिले त्या स्वराज्याचे सुराज्य व्हावे या प्रक्रियेत जास्तीत जास्त ताकदीने सदैव कार्यरत राहण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळाली. (Pimpri Chinchwad News)
यावेळी माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, तेजस्विनी कदम, सचिन चिंचवडे, सदाशिव खाडे, अमित गोरखे राजु दुर्गे, महेश कुलकर्णी, काळुराम बारणे, शीतल शिंदे, राजेद्र गावडे, सुरेश भोईर, उज्जला गावडे, अश्विनीताई चिंचवडे, तेजस्वी कदम, शितल शिंदे, राजेद्र चिंचवडे, विनोद तापकीर, प्रशात अगज्ञान, विठ्ठल भोईर, अजित कुलथे, सिध्दांत चिंचवडे, मंगेश शिवले, रविंद्र देशपांडे, रविंद्र प्रभुणे, शुभम डांगे, मधुकर बच्चे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.