Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri chinchwad News : ‘ट्रॅफिकमुक्ती’च्या दिशेने टाळगाव चिखली, तळवडेची वाटचाल..!आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेची अंमलबजावणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 August 2023, 11:05

Pimpri chinchwad News : पिंपरी : महापालिका हद्दीतील टाळगाव चिखली आणि तळवडे परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील मोठ्या परिसरातील दळणवळण सक्षम होणार असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. या दोन्ही गावांची वाटचाल ‘ट्रॅफिकमुक्ती’च्या दिशेने होणार आहे.

रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत टाळगाव चिखली आणि तळवडे भागातील अंतर्गत रस्तयांच्या कामांसाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.

सन १९९९ साली टाळगाव चिखली आणि तळवडे गावचा समावेश झाला. मात्र, अद्यापही अंतर्गत रस्त्यांचा दर्जा निकृष्ठ आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि रहदारी याचा विचार करुन तात्काळ रस्त्याची कामे मार्गी लावावीत, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याची प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे.

 

शहरात चिखली-मोशी-चऱ्होली असा सर्वात मोठा ‘रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित होत आहे. चिखली गावाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अध्यात्म आणि वारकरी सांप्रदायाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे सुरू झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी अध्यात्म आणि वारकरी सांप्रदयातील व्यक्ती चिखलीला भेट देतात.
तळवडेत आयटी पार्क आणि औद्योगिक पट्टा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. तसेच, श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीला जोडणारा रस्ता चिखलीतून जातो. चाकण औद्योगिक पट्यातून ये-जा करणारे कामगार, कष्टकरी, तळवडे एकआयडी, जाधववाडी भागातील व्यावसिक पट्टा या भागातून मोठ्या प्रमाणात चिखलीतून रहदारी होत असते. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली होती.

… या रस्त्यांना मिळणार गती
महापालिका प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात १) प्रभाग क्रमांक १ चिखली मधील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपिठकडे जाणारा १८ मीटर रुंद डीपी रस्ता व इतर डीपी रस्ते विकसित करणे. २) प्रभाग क्रमांक १ चिखली मधील साने चौक ते चिखली चौक रस्ता मंजूर विकास आराखड्यानुसार विकसित करणे. ३) प्रभाग क्रमांक १ चिखली मधील देहू आळंदी ते सोनवणे वस्ती कडे जाणारा ३० मीटर रुंद डीपी रस्ता विकसित करणे. ४) चिखली चौक ते सोनवणेवस्तीकडे जाणारा २४ मी. रुंद रस्ता विकसित करणे.

५) प्रभाग क्रमांक १२ मधील त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रस्ता विकसित करणे. ६) प्रभाग क्रमांक १२ मधील तळवडे कॅनबे चौक ते भक्ती शक्ती चौकापर्यंत देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाणारा उर्वरित २४ मीटर रस्ता विकसित करणे. ७) प्रभाग क्रमांक १२ मधील नदीच्या कडेने जाणारा मंजूर विकास योजनेतील रस्ता विकसित करणे १२ मीटर रुंद आदी रस्त्यांच्या कामांना गदी देण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली आणि तळवडे परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करुन शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडल्यास ‘कनेक्टिव्हीटी’ वाढणार आहे.

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, महापालिका विकास आराखड्यानुसार (DP) रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्यात यावी. त्यामुळे समाविष्ट गावांतील नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. शहरात समातोल विकासाचे सूत्र प्रभावीपणे राबवायचे असेल, तर प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी आणि रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली होती. त्याला प्रतिसाद देत रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत आहेत. लवकर याबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Solapur News : उमरड येथे विद्युत ट्रांसफार्मर मधील साहित्यांची चोरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.