Shikrapur News : पुणे : परीक्षा म्हटली की यश आणि अपयश दोन्ही येतेच. काही विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात, तर काही विद्यार्थी नापास होतात. मात्र, शिक्रापूर येथील एका महाविद्यालयातील एकाच वर्गातील सर्वच विद्यार्थी नापास झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाने बी.कॉमच्या प्रथम वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर केले. या परीक्षेत महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी नापास झाल्याचा निकाल हाती आला आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला. या प्रकरणाची चौकशी केली असता, महाविद्यालयानेच विद्यापीठाला वेळेत गुण पाठवले नसल्याने सर्वच विद्यार्थ्यांना ‘नापास’ असा निकाल दिल्याचे उघडकीस आले आहे.
महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी नापास?
याबाबत बोलताना महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणाले की, आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी नापास झाले. कुणालाच द्वितीय सत्राचा एकही गुण मिळाला नाही. (Shikrapur News) हे नेमके काय प्रकरण आहे, याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठात विचारणा केली असता, महाविद्यालयानेच वेळेत गुण पाठवले नसल्याचे कळाले. याबाबत महाविद्यालयाला विचारले असता, रोज नवनवीन उत्तरे मिळत आहेत.
काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक प्रतिक्रीया देताना सांगितले की, आम्हाला महाविद्यालयाकडून आता पुन्हा परीक्षेचा अर्ज भरा, असेही सूचविले जात आहे. आमची कोणतीही चूक नाही. असे असताना आम्ही हा नाहक भूर्दंड का भरायचा, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. विद्यार्थी म्हणाले की, महाविद्यालयातील सर्वांचा निकाल नापास आल्याने आम्ही दचकलोच. (Shikrapur News) फक्त द्वितीय सत्राचे सर्व विषय सर्वच विद्यार्थी कसे अनुत्तीर्ण होतील, हा प्रश्न आम्हाला पडला. म्हणून महाविद्यालयात विचारले असता त्यांनी विद्यापीठात जायला सांगितले. तिथे गेल्यावर गुण वेळेत मिळाले नसल्याचे समजले.
दरम्यान, महाविद्यालयात याबद्दल जाब विचारला असता, अरेरावीची भूमिका घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आमच्यातील काहींनी तर पोलीस स्टेशमध्येही दाद मागितली होती. (Shikrapur News) अनेकांना पुढील वर्षात प्रवेश घ्यायचा आहे. वेळेत निकाल न मिळाल्यामुळे आम्ही संभ्रमात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत परीक्षा विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा जलद निकाल प्रक्रिया राबवली. (Shikrapur News) त्यासाठी विहीत मुदतीत महाविद्यालयांनी पेपर तपासून गुणपत्रिका पाठवण्याची गरज होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. म्हणून त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात जलदगतीने निकाल घोषित होतील, असे सांगण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shikrapur News : शिक्रापुरातील महिला देव दर्शनाला गेली अन् चोरट्यांनी घरावर मारला डल्ला..