Big Breaking मणिपूर : मणिपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरापर्यंत अनेक भागात गोळीबार झाला आहे. या हिंसाचारात IRF जवानासह किमान ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये मृतांचा आकडा १६० पर्यंत गेला आहे. (Big Breaking)
युम्नाम पिशाक मेईतेई (वय-६७) आणि त्यांचा मुलगा युम्नाम प्रेमकुमार मेईतेई अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय त्यांचा शेजारी युम्नाम जितेन मेईतेई याचीही हत्या करण्यात आली होती. (Big Breaking)
मिळालेल्या माहितीनुसार, क्वाटा परिसरात मेईतेई समाजातील तीन लोकांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहांचीही नासधूस केली. काही तासांनंतर चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी समाजातील दोन लोकांची हत्या करण्यात आली. या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहे.
मणिपूर रायफल्सचा एक जवानही शहीद झाला आहे. तसेच जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला आहे. यामध्ये २३५ असॉल्ट रायफल, २१ सब-मशीन गन, १६ पिस्तूल, ९ हजार गोळ्या आणि १२४ हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळ्याचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराचा दावा आहे की त्यांनी मोंगचम परिसरात कुकी समुदायाच्या हल्लेखोराला पकडलं आहे. त्याच्याकडून शस्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.