सोलापूर : सोलापूर आणि पंढरपुरात आयकर विभागाने आज गुरुवारी (ता. २५) सकाळपासून धाडी टाकण्यास सुरूवात केली आहे.आयकर विभागाने सोलापुर शहरातील एका खासगी रूग्णालयात व हदयरोग तज्ञ रूग्णालयातील डॉक्टरांच्या घरी धाडी टाकल्या आहेत. तर पंढरपूर शहरात एका साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरावर व कार्यालयावर आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत.
ते अधिकारी अधिक चौकशी करून संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या पाच तासांपासून दोन्ही ठिकाणी चौकशीचे सत्र सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईने वैद्यकीय व साखर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. धाडीनंतर आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करून अधिक चौकशी करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याशिवाय दरम्यान, उस्मानाबाद येथील एका साखर कारखान्यावरही आयकर विभागाने धाड टाकल्याचे सांगितले जात आहे.