School News : लोणी काळभोर, (पुणे) : मुलांनी वाढत्या वयाबरोबर वाढणार्या जबाबदाऱ्यांचा जाणीवपुर्वक स्विकार करून या जबाबदाऱ्या उत्तमपणे निभावण्यासाठी प्रथमतः स्वत्वाची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. तसेच मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक जाणिवांविषयी ‘रेनबो इंटरनॅशनल स्कूल’ करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारत माता अभियानाच्या परिमला पांडे यांनी केले आहे. School News
‘व्यक्तिमत्व विकास व सामाजिक जाणीव’ या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन..
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्ञानप्रबोधिनी व संवादिनी विकास गटातर्फे इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ‘व्यक्तिमत्व विकास व सामाजिक जाणीव’ या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पांडे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्कूलच्या व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, रेनबो स्कूलच्या प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे, पर्यवेक्षिका पायल बोळे, इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. School News
यापुढे बोलताना परिमला पांडे म्हणाल्या, एकविसाव्या शतकामधला विज्ञान व तंत्रज्ञानातील वेग व जागतिकीकरणाची प्रक्रिया यांमुळे आपल्या जीवनशैलीत फार मोठा बदल झाला आहे. त्यामुळे होणार्या बदलांना आपल्याला व आपल्या मुलांना सामोरे जाऊन त्यांच्याशी समायोजन करणे आवश्यक आहे.” School News
यावेळी ज्ञानप्रबोधिनी संवादिनी विकसिका गटाच्या साधना सेठिया, वैशाली कुलकर्णी, नीलिमा रानडे, मीनल पेंडसे, संगीता नेत्रगावकर, सुनिता भन्साळी व समता झावरे या मार्गदर्शिकांनी सहभाग घेऊन, निरीक्षण कौशल्य, सामर्थ्य सवयींचे, निर्णय क्षमता, सुरक्षा जाणिवा, रंग भावनांचे हे विषय कृती, खेळ, गोष्टी, प्रसंग व काही प्रसिद्ध व्यक्ती यांची उदाहरणे देऊन मुलांन मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना विविध ‘रोल प्ले’ खेळांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती तसेच सण साजरा करण्याच्या पद्धती यांविषयी योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही बाबी मुलांसमोर मांडण्यात आल्या. रंग भावनांचे याविषयी मार्गदर्शन करताना राग, भीती, दुःख, आनंद, घृणा,किळस तसेच चिंता या वेगवेगळ्या भावना खेळांमधून दर्शविण्यात आल्या.
दरम्यान, मुलांमध्ये सामाजिक भान वाढवणे तसेच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या उद्देशाने रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनीषा सुपेकर यांनी मानले.