Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor School News : मुलांचा व्यक्तीमत्व विकास व सामाजिक जाणिवांविषयी ‘रेनबो स्कूल’ करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद – परिमला पांडे..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 1 August 2023, 18:10

School News : लोणी काळभोर, (पुणे) : मुलांनी वाढत्या वयाबरोबर वाढणार्‍या जबाबदाऱ्यांचा जाणीवपुर्वक स्विकार करून या जबाबदाऱ्या उत्तमपणे निभावण्यासाठी प्रथमतः स्वत्वाची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. तसेच मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक जाणिवांविषयी ‘रेनबो इंटरनॅशनल स्कूल’ करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारत माता अभियानाच्या परिमला पांडे यांनी केले आहे. School News

‘व्यक्तिमत्व विकास व सामाजिक जाणीव’ या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन.. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्ञानप्रबोधिनी व संवादिनी विकास गटातर्फे इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना ‘व्यक्तिमत्व विकास व सामाजिक जाणीव’ या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पांडे बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी स्कूलच्या व्यवस्थापिका मंदाकिनी काळभोर, रेनबो स्कूलच्या प्राचार्या मीनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे, पर्यवेक्षिका पायल बोळे, इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. School News

यापुढे बोलताना परिमला पांडे म्हणाल्या, एकविसाव्या शतकामधला विज्ञान व तंत्रज्ञानातील वेग व जागतिकीकरणाची प्रक्रिया यांमुळे आपल्या जीवनशैलीत फार मोठा बदल झाला आहे. त्यामुळे होणार्‍या बदलांना आपल्याला व आपल्या मुलांना सामोरे जाऊन त्यांच्याशी समायोजन करणे आवश्यक आहे.” School News

यावेळी ज्ञानप्रबोधिनी संवादिनी विकसिका गटाच्या साधना सेठिया, वैशाली कुलकर्णी, नीलिमा रानडे, मीनल पेंडसे, संगीता नेत्रगावकर, सुनिता भन्साळी व समता झावरे या मार्गदर्शिकांनी सहभाग घेऊन, निरीक्षण कौशल्य, सामर्थ्य सवयींचे, निर्णय क्षमता, सुरक्षा जाणिवा, रंग भावनांचे हे विषय कृती, खेळ, गोष्टी, प्रसंग व काही प्रसिद्ध व्यक्ती यांची उदाहरणे देऊन मुलांन मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना विविध ‘रोल प्ले’ खेळांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती तसेच सण साजरा करण्याच्या पद्धती यांविषयी योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही बाबी मुलांसमोर मांडण्यात आल्या. रंग भावनांचे याविषयी मार्गदर्शन करताना राग, भीती, दुःख, आनंद, घृणा,किळस तसेच चिंता या वेगवेगळ्या भावना खेळांमधून दर्शविण्यात आल्या.

दरम्यान, मुलांमध्ये सामाजिक भान वाढवणे तसेच मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या उद्देशाने रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनीषा सुपेकर यांनी मानले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Loni Kalbhor News : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या 'रामदरा' रस्त्याची अवस्था, 'खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे' ; पूर्व हवेलीत डझनभर पक्षांचे दोन-चार डझन मोठे नेते असूनही जनता खड्ड्यातच !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.