Haveli News : पुणे : महसूल विभागामार्फत राज्यात १ ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करण्याबरोबरच १ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महसूल सप्ताह निमित्ताने नागरिकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी तत्पर असल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधक अधिकारी दत्तात्रय सातभाई यांनी दिली.
“महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार;
यावेळी हवेली क्रमांक २ च्या कार्यालयात विविध प्रकराची रांगोळी काढण्यात आली होती. येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करण्यात येत होते. तसेच तिरंगा झेंडा स्वरूपात फुग्याची सजावट करण्यात आली होती. Haveli News
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसूल कामे वेळेत पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसूलीच्या नोटीस पाठवणे, मोजणी करणे इत्यादी कामे वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आणि महसूल उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो.
या वर्षी १ ते ७ ऑगस्टला महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहीम, कार्यक्रम, उपक्रम, शिबिरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे. Haveli News
दरम्यान, नोंदणी विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे;
१. संगणकीकृत ऑनलाईन दस्तऐवजाची नोंदणी.
२. जेष्ठ नागरीक, अपंग, आजारी व्यक्ती, गर्भार माता यांचे दस्तांची प्राधान्याने नोंदणी.
३. मोबाईल क्र. व Mail Id नमुद केल्यास दस्ताची माहिती SMS व मेलव्दारे मिळते.
४. घरबसल्या मिळकतीचा शोध घेण्याची विभागाचे वेबसाईटवर ऑनलाईन सुविधा.
५. ऑनलाईन सुचि क्रमांक-२ काढण्याची विभागाचे वेबसाईटवर सुविधा.
६. घरबसल्या आपल्या मिळकतीचे मुल्यांकन काढण्याची विभागाचे वेबसाईटवर सुविधा.
७. विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा
८. कार्यालयात न येता कर्ज प्रकरणातील नोटीस ऑफ इंटीमेशनची ऑनलाईन सुविधा.
९. कार्यालयात न येता लिव्ह अॅन्ड लायसन्सचे ऑनलाईन फायलिंग करण्याची सुविधा
१०. कार्यालयात प्रतिक्षा न करण्यासाठी आगावू E Stape In व्दारे टोकन बुकींग सुविधा
.११. सलोखा योजनेत मुद्रांक शुल्क माफी, रू.१००० चे मुद्रांकावर दस्त नोंदणी.
१२. महिला खरेदीदारांना निवासी मिळकतीसाठी मुद्रांक शुल्कात १% ची सवलत.
१३. विदयार्थी यांचे करीता शैक्षणीक कर्जाचे गहाणखतास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी
१४. विदयार्थी यांचे करीता शपथपत्रास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी.
१५. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत केवळ रु. १०००/- मुद्रांकावर दस्त नोंदणी.
१६. नविन उदयोगासाठीचे प्रथम दस्तास मुद्रांक शुल्कातुन पुर्ण माफी…
१७. जलद, तत्पर, सुलभ व विश्वसनिय सेवा देवून जनतेच्या अभिलेखाचे जतन.
दरम्यान, या कार्यक्रमांचे नियोजन करुन याबाबतची प्रचार व प्रसिध्दी करण्याबरोबरच महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती विशद करणाऱ्या लघु चित्रफिती तयार करुन विविध प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात येणार आहेत.