Sambhaji Bhide News : यवतमाळ : महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करून इतिहासाचे विकृतीकरण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तरिही भिडे यांचे बरळणे सुरूच आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. विधानसभेतही भिडे यांच्या विधानाचे संतप्त पडसाद उमटले. भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. भिडेंचं हे वादग्रस्त विधान ताजे असतानाच त्यांनी अजून एक वादग्रस्त विधान केले आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.(Sambhaji Bhide News)
भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली.
अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र, कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी चीनसोबत केलेला पंचशील करार भारताला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने आपला पराभव केला आणि ईशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, अशी टीका भिडे यांनी येथे केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.(Sambhaji Bhide News)
दरम्यान, शिवप्रतिष्ठानने आज वाशीमच्या काळे लॉनमध्ये संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. भिडे यांच्या या व्याख्यानाला विविध पक्ष आणि आणि संघटनांनी विरोध केला आहे. संभाजी भिडे ज्या मार्गावरून जाणार त्या अकोला नाका येथे काँग्रेस, संभाजी ब्रिग्रेड, भीम टायगर, वंचित बहुजन आघाडीसह इतर सामाजिक संघटनेने काळे रुमाल दाखवून निषेध केला. त्यामुळे वाशीममध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेससह इतर पक्ष भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहेत. काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केले आहे. आज वाशीम येथे होणाऱ्या व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(Sambhaji Bhide News)
भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचे गोंदियातही पडसाद उमटले आहेत. गोंदियात सेवा दलाने गांधी चौकात भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या वेळी भिडेंना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली. या वेळी सेवा दलाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(Sambhaji Bhide News)