Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sambhaji Bhide News : भिडे गुरूजींनी पुन्हा ओकली गरळ ; गांधींनंतर नेहरू टार्गेट ; विधानसभेत पडसाद ; आजच्या सभेला मोठा पोलीस बंदोबस्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 11:33

Sambhaji Bhide News  : यवतमाळ : महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करून इतिहासाचे विकृतीकरण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तरिही भिडे यांचे बरळणे सुरूच आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. विधानसभेतही भिडे यांच्या विधानाचे संतप्त पडसाद उमटले. भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. भिडेंचं हे वादग्रस्त विधान ताजे असतानाच त्यांनी अजून एक वादग्रस्त विधान केले आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर भिडे यांनी थेट स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे.(Sambhaji Bhide News)

भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली.

अखंड हिंदुस्थानासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नखाएवढेही योगदान नाही. मात्र, कोणतेही कर्तृत्व नसताना ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी चीनसोबत केलेला पंचशील करार भारताला मारक ठरला. त्यांच्या चुकीमुळे चीनने आपला पराभव केला आणि ईशान्येकडील भूभाग गिळंकृत केला. हा भूभाग परत मिळविण्यासाठी आजपर्यंत कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधीही गप्प आहेत, अशी टीका भिडे यांनी येथे केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.(Sambhaji Bhide News)

दरम्यान, शिवप्रतिष्ठानने आज वाशीमच्या काळे लॉनमध्ये संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. भिडे यांच्या या व्याख्यानाला विविध पक्ष आणि आणि संघटनांनी विरोध केला आहे. संभाजी भिडे ज्या मार्गावरून जाणार त्या अकोला नाका येथे काँग्रेस, संभाजी ब्रिग्रेड, भीम टायगर, वंचित बहुजन आघाडीसह इतर सामाजिक संघटनेने काळे रुमाल दाखवून निषेध केला. त्यामुळे वाशीममध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेससह इतर पक्ष भिडे यांच्याविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहेत. काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केले आहे. आज वाशीम येथे होणाऱ्या व्याख्यानाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(Sambhaji Bhide News)

 

भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचे गोंदियातही पडसाद उमटले आहेत. गोंदियात सेवा दलाने गांधी चौकात भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. या वेळी भिडेंना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली. या वेळी सेवा दलाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(Sambhaji Bhide News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Mumbai News : पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? कुलाब्यात यंत्रणा अलर्ट मोडवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.