सागर जगदाळे
Bhigavan News : राज्यात सध्या तीस हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याबाबतची घोषणा राज्य शासनाच्या वतीने केलेली आहे. ही शिक्षक भरती करत असताना बिंदू नामावली म्हणजेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रोस्टर भरून त्याप्रमाणे प्रत्येक प्रवर्गातील शिक्षकांची नमूद प्रवर्गामध्ये नोंद करून त्याप्रमाणे भरती केली जाते. परंतु, सध्या राज्यामध्ये चालू असलेल्या आंतरजिल्हा बदली तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या बिंदूनामावली म्हणजेच रोस्टरमध्ये झालेल्या घोळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक खुल्या प्रवर्गातील शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर दुरुस्त करून शिक्षक भरती प्रक्रिया करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे दक्षिणचे जिल्हाध्य़क्ष अॅड. पांडुरंग जगताप यांनी केली आहे.(Bhigavan News)
प्रवर्गातील शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे नुकसान होत आहे.
2023 मध्ये पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गाकरिता ज्या प्रमाणात आरक्षित टक्केवारीच्या पेक्षा कमी जागा येत असल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषद यामध्ये बिंदू नामावली तपासणीचे काम शासनाच्या आदेशाने चालू केलेले होते. परंतु, त्या तपासणीमध्ये खुल्या प्रवर्गातील बिंदूवर मागासवर्ग प्रवर्गाच्या बिंदूचे अतिक्रमण होत आहे, असे निदर्शनात आले आहे. तसेच बिंदू नामावलीमध्ये अनियमिता असल्यामुळे खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या जागा अतिशय कमी येत आहे. त्यामुळे त्या प्रवर्गातील बिंदूंना त्याच प्रवर्गात दाखवण्यात यावे.(Bhigavan News)
तसेच त्यामध्ये निवड प्रक्रिया उपलब्ध नसणे, नियुक्त आदेश उपलब्ध नसणे, जात पडताळणी दाखला उपलब्ध नसणे, ईडब्लूएस प्रवर्गाची कोणतीही भरती झालेली नसताना देखील अनेक जिल्हा परिषदेमध्ये ईडब्ल्यूएसच्या बिंदूंवर अगोदर वेगळ्या प्रवर्गात नियुक्त झालेल्या लोकांना दर्शविण्यात येणे. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दर्शविण्यात येत आहे. वस्तीशाळा शिक्षकांची नियुक्ती देताना खुल्या प्रवर्गांमध्ये दर्शवण्यात आलेले आहे. पुरावे नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखवण्यात येत आहे, अशा प्रकारच्या त्रुटी समाविष्ट केलेल्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनेक खुल्या प्रवर्गातील शिक्षकांवर यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला होता.(Bhigavan News)
त्यामध्ये राज्य शासनाचे वतीने योग्य ती पावले उचलून पूर्वी झालेल्या बिंदू नामावलीमध्ये दुरुस्ती करून आंतरजिल्हा बदली शिक्षक भरतीमध्ये बिंदुनामावलीप्रमाणे योग्य व काटेकोरपणे दुरुस्ती करून खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना योग्य न्याय द्यावा. या बिंदूनामावलीमध्ये घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्य काळामध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या 30 हजार शिक्षक भरतीमध्ये सदर बिंदूनामावलीप्रमाणे रोस्टर दुरुस्ती करुन आरक्षणाच्या टक्केवारीनुसार खुल्या प्रवर्गातील जागा थेट भरण्यात याव्या, अशी राज्य शासनाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केलेली.(Bhigavan News)
या मागणीची दखल न घेतल्यास नाईलाजाने राज्यातील खुल्या प्रवर्गातील शिक्षक बांधवांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर सनदशीर मार्गाने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सोबत येणाऱ्या शिक्षक संघटनांना बरोबर घेऊन अतिशय तीव्र पद्धतीने जनआंदोलन करणार आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला शासन जबाबदार राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.