Loni Kalbhor News लोणी काळभोर : मुंबईहून सातारा, सोलापुरसह इतर जिल्हातील तेल डेपोंना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणारी एच.पी. कंपनीची पाईपलाईन जमिनीखालून गेली आहे. ही लाईन फोडण्याचा प्रयत्न आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) हद्दीतील निर्जन डोंगरावर झाल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत रजिस्टर नं. ४७४/२३ भादवी ३७९,५११ २८६ ४२७ सह पेट्रोलियम व खनिज वाहतूक कायदा १९६२ कलम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor News)
दरम्यान, लोणी काळभोर, फलटण, सासवड, भोसरीसह राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वी अनेक वेळा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणाऱ्या विविध पेट्रोलियम कंपनींच्या जमिनीखालील पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न झालेला आह. यामध्ये मोठ-मोठ्या आंतरराज्यीय टोळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आळंदी म्हातोबाची परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या चोरीच्या घटनेत देखील आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. (Loni Kalbhor News)
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा, कोल्हापूर, सांगलीला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणाऱ्या एच. पी. कंपनीची मुंबई-पुणे ते लोणी काळभोरहून आळंदीच्या डोंगरातून पुढे सातारा जिल्ह्यात जाते. ही जमिनीखालील पाईपलाईन अज्ञात चोरट्यांनी ड्रिल मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब कंपनीच्या अधिकाऱ्यांना सेंसरद्वारे लक्षात आली. ही बाब तत्काळ एच.पी. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसांना कळवली. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ आळंदी परिसरातील डोंगरात धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोचले असता, संबंधित ठिकाणी जमिनीखालील पाईपलाईनला एक इंच व्यासाचा व शंभरहून अधिक इंच लांबीचा पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. (Loni Kalbhor News)
याबाबत कंपनीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी चोरट्यांनी पाईपलाईनला छिद्र पाडले असले तरी, त्या ठिकाणाहून इंधन चोरी झालेली नाही. मात्र, इंधनचोरीचा चोरट्यांचा प्रयत्न असल्याची बाब उघडकीस आली आहे.