रवींद्र पाटील
Scholarship Exam : शिक्रापूर, (पुणे) : पिंपळे खालसा – हिवरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसेनानी कै. शंकरराव बाजीराव डावखरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे तब्बल ३५ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. अशी माहिती प्राचार्य राजू घोडके यांनी दिली. Scholarship Exam :
दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले असून या शाळेने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. आयुष उमेश खरपुडे (२७०) हा राज्य गुणवत्ता यादीत १३ वा तर धीरज संतोष गायकवाड (२६२) हा राज्य गुणवत्ता यादीत २१ वा आला आहे.
या परिक्षेस एकूण १२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७९ विद्यार्थी पात्र झाले तर ३५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले अशी माहिती प्राचार्य घोडके यांनी दिली. या विद्यार्थ्यांना कल्याण कडेकर, उर्मिला मांढरे, मनोज नायकवडी, मोहन बोराटे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सोपानराव धुमाळ, सचिव एकनाथ झेंडे, उपाध्यक्ष शहाजीराव धुमाळ, संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे, कंसात त्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे :-
पार्थ संतोष धुमाळ (२३६),
ओम ज्ञानेश्वर पलांडे (२३६),
कुणाल राजेंद्र बढे (२३६),
संकेत नवनाथ शिदोरे (२३४),
ओम दत्तात्रय वाबळे (२३४),
सई ललितकुमार गावडे (२२८),
प्रांजल सुभाष गावडे (२२४),
शिवम मोहन बोराटे (२२२) ,
स्वराज संदीप भोगावडे (२२०),
संस्कार संतोष दगडे (२२०),
समृद्धी नंदकुमार पलांडे (२१८),
ओंकार रोहिदास धुमाळ (२१२),
रुद्रेश राजाराम निर्मळ (२१२),
तनुश्री कैलास मासळकर (२१२),
श्रीगणेश शंकर मांदळे (२१०),
सार्थक गणेश शिवले (२०८),
सिद्धीका विजय खैरे (२०६),
नवाज रशीद शेख (२०६) ,
ऋतुजा विठ्ठल साळुंके (२०४),
दिव्याराणी बापू दरेकर (२०२),
ऋतुराज सतीश जाधव (२०२),
सुजल नानासाहेब घाडगे (२०२),
ईश्वरी संजय गरुड (२०२),
विराज काळुराम शिवले (२००),
सार्थक किसन पलांडे (१९८),
आयुष कांतीलाल धुमाळ (१९६),
स्वरा नवनाथ डेरे (१९६),
सार्थक शरद दौंडकर (१९४),
अक्षदा दिपक पवार (१९४),
हर्षराज वसंत धुमाळ (१९२), संस्कृती रवींद्र उमाप (१९२),
ओम अतुल तांबे (१९२),
सार्थक संतोष बगाटे (१९०)