Pune News : पीएमपी बसमध्ये एका बारावीच्या विद्यार्थिनीशी लगट करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील पौड रस्त्यावर नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एकावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तरुणाच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत व विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जात होती. त्यावेळी बस प्रवासात आरोपी तिच्या जवळच्या आसनावर येऊन बसला.त्यानंतर त्याने अश्लील वर्तन कले.(Pune News)
दरम्यान, फिर्यादी तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर पिडीत तरुणीने थेट वारजे पोलीस ठाणे गाठले. आणि अनोळखी तरुणाच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.