Lonavala News : लोणावळा, (पुणे) : मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधबा येथे पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा पाय घसरून तो वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील आंबी परिसरात ही घटना घडली आहे.
पोलिसांकडून शोधकार्य सुरु
ओंकार गायकवाड असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण टाटा मोटर्स या कंपनीत कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी त्याचे शेवटचे काढलेले व्हिडिओ देखील समोर आले आहेत. वाहून गेलेल्या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत वर्षा विहारासाठी कुंडमाळ धबधबा येथे आला होता. सेल्फी काढण्यासाठी तो पाण्याच्या प्रवाहात उभा राहिला मात्र त्याचा पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यासोबत वाहून गेला. (Lonavala News) घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि आंबी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
इंद्रायणी नदीवर हा धबधबा तयार झाला असून पावसाळ्यात तो पर्यटकांना खुणावत असतो. हा तरुण वाहून गेल्याने त्याला शोधण्याचे काम पोलिस, स्थानिक नागरिक आणि रिस्क्यू टीमकडून सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Lonavala News : जिल्हा परिषद शाळेतील 12 वर्षाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
Lonavala News : लोणावळ्यानजिक घनदाट जंगलात हरविलेल्या चार तरुणांना शोधण्यात यश
Lonavala News : ‘चारधाम’ यात्रेचे आमिष दाखवत 37 जणांची केली फसवणूक ; दहा लाखांना घातला गंडा