Ramesh Thorat : दौंड, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे तालुक्यातील नितीन दोरगे, विकास खळदकर, दिलीप हंडाळ, वैशाली नागवडे अधिक कार्यकर्तेसह अजित पवार हे घेत असलेल्या शक्तिप्रदर्शन सभेला मुंबई येथील एम ई टी इन्स्टिट्युट मध्ये हजर होते. त्यावरून त्यांची भूमिका ही स्पष्ट झाली आहे. Ramesh Thorat
पाहिले तर माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात त्यामुळे ते त्या गटात जातील हे निश्चित होते पण ते अधिकृतपणे आजपर्यंत मीडियासमोर सांगितले नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. Ramesh Thorat
तो संभ्रम आज संपुष्टात आला असून कार्यकर्ते मात्र निश्चित झाले आहेत. तसेच दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार हे मात्र एकटे यावेळी उपस्थित नव्हते त्यामुळे ते शरद पवार साहेबांच्या गटामध्येच राहतील जाणकार सांगत आहेत. Ramesh Thorat
दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये राज्य प्रमाणेच दौंड तालुक्यामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पाहायला मिळतील हे निश्चित झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाचे उमेदवार पाहायला मिळतील का? हे पाहणे अवचितत्याचे ठरेल.
राष्ट्रवादीच्या फुटीमुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासाठी कभी खुशी कभी गम..
येणाऱ्या मंत्रिमंडळाचे विस्तारामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांचे मंत्रीपद जवळपास निश्चित झाले होते. पण ऐनवेळी अजित पवार हे त्यांच्या आमदारासह सरकारमध्ये सामील झाले आणि आमदार राहुल कुल यांचे मंत्रीपद ताटकळत पडले तसेच राष्ट्रवादी फुटीचा आमदार राहुल कुल यांना नकळत फायदाही झालेला जाणवतो कारण दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पाहायला मिळत असून त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आ. राहुल कुल यांना होणार हे निश्चित होऊ शकतो. Ramesh Thorat