Big Breaking : दौंड, (पुणे) : कौटुंबिक वादातून डॉक्टर असलेल्या पतीने दोन लहान मुलांची आणि पत्नीची निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना वरवंड (ता. दौंड) येथे घडली आहे. तसेच पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी (दि २०) दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे दौंडसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Big Breaking)
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर (वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. (Big Breaking)
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दिवेकर हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. तर त्यांची पत्नी हि एका शाळेत शिक्षिका आहेत. डॉक्टर दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहित नेऊन टाकली आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत त्यापुर्वी त्याने चिठ्ठी लिहिल्याचे बोलले जात आहे. (Big Breaking)
या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन लहान मुले अद्याप सापडली नसून त्यांचा शोध ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस विहिरीचे पाणी काढून सुरू आहे. ही घटना कशामुळे झाली याबाबत अद्याप कारण समोर आलं नाही पोलीस तपास करीत आहेत. (Big Breaking)