Pune News : पुणे : मुलांना मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामध्येच ते गुंतून राहतात. यासोबतच टीव्हीच्या स्क्रीन टाइममुळे मुलांच्या डोळ्यांबरोबर स्मरणशक्तीवरदेखील परिणाम झाल्याची उदाहरणे दिसून येतात. असे असताना दुसरीकडे या सर्वांवर मात करीत पुण्यातील दिव्यांक जगताप याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला आहे. (Entry of Divyank Jagtap from Pune in India Book)
57 सेकंदांत 52 पत्ते न बघता ओळखण्याचा विक्रम
दिव्यांक हा पुण्यातील बिबवेवाडी येथे राहत असून तो क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ यूबीएस या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकतो. दिव्यांकला स्मरणशक्तीचे विविध खेळ खेळण्याबरोबर पोहण्याची, सायकल चालविण्याची आवड आहे. (Pune News) कमी वयात केवळ 57 सेकंदांत 52 पत्ते न बघता ओळखण्याचा विक्रम त्याने केला आहे.
मुलांनी नेहमी मोबाईल किंवा टीव्ही बघण्यापेक्षा विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. (Pune News) दिव्यांकची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्याला लक्षात राहत असे.
मुलांनी नेहमी मोबाईल किंवा टीव्ही बघण्यापेक्षा विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. दिव्यांकची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्याला लक्षात राहत असे.
– राहुल जगताप, दिव्यांकचे वडीलदिव्यांकला नेहमी बुद्धीला चालना देणारे खेळ खेळायला आवडतात. म्हणून मीदेखील त्याला ते खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. नुकताच माझ्या मुलीनेदेखील ’बायनरी कोड’ ओळखण्याचा इंडिया बुकमध्ये विक्रम केला आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले तर त्यांना योग्य दिशा मिळते.
– राधिका जगताप, दिव्यांकची आई
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील बेपत्ता तरुणीचे गूढ उकलले ; पोलिसही चक्रावले…
Pune news : सुप्रियाताईंना नव्या इनिंगसाठी अजितदादांच्या मन:पूर्वक शुभेच्छा; म्हणाले…