संदीप टूले
Daund News : दौंड: दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी ( सरपंच)विरुद्ध विरोधी गट (ग्रामपंचायत सदस्य) यांच्यातील संघर्षमुळे नेहमीच चर्चेत असते. आता नवीन वाद देखील चांगलाच रंगला आहे. (Controversy flares up again in Kedgaon Gram Panchayat; Disputes due to oppressive conditions)
वादाचे कारण निविदा!
नवीन वादाचे कारण म्हणजे मागील काही दिवसापूर्वी ३० लाख रुपयांच्या कामाची निविदा केडगाव ग्रामपंचायत काढली आहे. यात ज्यांना टेंडर भरायचे आहे, त्यांनी स्थळपाहणी करून त्याचा फोटो घेऊन जिवो टॅग करून सरपंचांचे सही व शिक्का घेऊन पत्र जोडावे अशी नवीन अट त्यात टाकण्यात आली आहे.
या अटीवर ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप ,दिलीप हंडाळ ,नितीन कुतवळ, यांनी आक्षेप नोंदवला आहे.
ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंडाळ त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने जी कामाची निविदा काढली आहे, त्या निविदेमध्ये ज्यांना टेंडर भरायचे आहे. (Daund News) त्यांनी स्थळ पाहणी करून जिवो टॅग करून सरपंचांची सही व शिक्का असलेला पत्र जोडवयाचे आहे. त्यानंतरच या टेंडर प्रक्रियेत भाग घेता येईल. अशी ती जाचक अट टाकली आली आहे.
मात्र सरपंच हे त्यांच्याच जवळील काही लोकांनाचं सही शिक्का देत आहेत.(Daund News) मात्र ते इतरांना सही शिका देत नसून अडचण निर्माण केली जात आहे. तर यातील काही ठेकेदारांनी सरपंच यांना संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत.
त्यामुळे येणाऱ्या ८ तारखे पर्यन्त जर सरपंचाचे सही शिक्का असलेले पत्र त्या टेंडर प्रक्रियेला नाही जोडले तर टेंडर भरता येणार नाही. त्यामुळे ही अट आणि हा प्रकार जाणून बुजून केला जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य दिलीप हंडाळ यांनी इतर दोन सदस्यांनी केला आहे. (Daund News) हा प्रकार जर थांबला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून त्यांनी तसे l ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी स्वरूपात कळवले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दहावीला सर्वच विषयात ३५ मार्क
Daund News : दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार; माजी आमदार रमेश थोरात
Daund News : रावेर तालुका कृषी अधिकारीपदी काळेवाडीचे सुपुत्र भाऊसाहेब वाळके यांची निवड….