Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती येथे वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने सोलापूरकडे जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. सुदैवाने त्या वेळी या रस्त्यावर कसलीही वाहतूक नसल्याने अपघाताचा धोका टळला. (A tree fell in the storm at Inamdar Vasti near Uruli Kanchan on the Pune-Solapur highway)
वाहतुकीची एक लेन बंद..
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील इनामदारवस्ती या परिसरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी वाऱ्यात महामार्गाच्या कडेला असणारी जीर्ण झालेली झाडे पडण्याचा घटना घडत आहेत. (Uruli Kanchan News) त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून अशी जीर्ण झालेली झाडे तातडीने काढावी, अशी मागणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह प्रवाश्यांनी केली आहे.
दरम्यान, इनामदार वस्ती परिसरात (Uruli Kanchan News) राहत असलेल्या नागरिकांनी व नर्सरी व्यावसायिकांनी झाडांच्या कुंड्या ठेऊन पडलेले झाड रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan : सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.५२ टक्के