Kolhapur News : कोल्हापूर : मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन येऊन कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Diabetes medicine is killing?)
वडणगे येथील दिंडे कॉलनी येथील घटना
मधुकर दिनकर कदम (वय ५९ ) व जयश्री मधुकर कदम असे या दाम्पत्याचे नाव आहे. वडणगे येथील दिंडे कॉलनीमध्ये हे दाम्पत्य वास्तव्यास होते. आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता मयत जोडप्याच्या मुलींनी वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे येथील दिंडे कॉलनीत राहणारे कदम दाम्पत्य हे मूळचे शिवाजी पेठेतील आहेत. मधुकर कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. (Kolhapur News) वर्षभरापूर्वी ते आपल्या दोन मुलींसह नवीन घरात राहायला आले होते. वय झाल्याने पती पत्नींना काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू झाला होता.
वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते. आज सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली. नंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले आणि त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. दरम्यान काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले. (Kolhapur News) त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळात त्या बेशुद्ध पडल्या. तर तिकडे दूध आणण्यासाठी गेलेल्या शिवपार्वती चौकातील डेअरीत मधुकर कदमही चक्कर येऊन पडले.
यावेळी नागरिकांनी कदम दाम्पत्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र खासगी डॉक्टरांनी दोघांनाही सीपीआरमध्ये पाठवण्यास सांगितले. सीपीआरमधील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. (Kolhapur News) या दाम्पत्याला १९ वर्षाची गायत्री कदम आणि १७ वर्षाची विजया कदम या दोन मुली आहेत. आई-वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे या दोन्ही मुलींना धक्का बसला आहे. तर हे औषध घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय मुलींनी व्यक्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kolhapur News : पुणे-बंगळूर महामार्गावर आर्टिगाची रोडरोलरला धडक; दोघांचा मृत्यू,चार गंभीर जखमी
Kolhapur News : दोन सख्ख्या भावांनी अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने घेतला जगाचा निरोप…!