Pune News : पुणे: स्पीकरवरून निर्माण झालेला वादातून अपमानित झाल्याने एका 70 वर्षीय नागिरकाने बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार नवी खडकी येथे 28 मे रात्री घडला. (A 70-year-old citizen committed suicide after being humiliated by an argument over the speaker, an incident in Yerwada)
येरवड्यातील घटना
ज्ञानेश्वर साळुंखे (वय 70, रा. नवी खडकी) असे आयुष्य संपवलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. या प्रकरणी पांडुरंग ज्ञानेश्वर साळुंखे (वय 47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News) चेतन बेले (वय 26), देवेश ऊर्फ नन्या पवार (वय 18), यश मोहिते (वय 19), शाहरुख खान (वय 26), जय तानाजी भडकुंभे (वय 22) या 5 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळुंखे यांच्या घराशेजारी चेतन बेले राहतात. त्यांच्या घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता. स्पीकर लावल्यामुळे त्याठिकाणी मोठा गोंधळ सुरू होता. (Pune News) स्पीकरच्या आवाजाचा त्रास होत असल्याने ज्ञानेश्वर साळुंखे यांनी त्या ठिकाणी जाऊन आवाज करु नका, आम्हाला त्रास होतो असे सांगितले. यावरून आरोपींनी त्यांना अपमानित केले आणि हाकलून दिले.
त्यानंतरही बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे साळुंखे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन आवाज कमी करा असे सांगत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Pune News) त्यांच्या घरातील लोक त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली.
चेतन बेले याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले. फिर्यादी हे येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी यांनी पुन्हा फिर्यादीचे वडिल ज्ञानेश्वर साळुंखे यांना मारहाण केली. (Pune News) मारहाणीमुळे होणार्या वेदना व अपमान सहन न झाल्याने त्यांनी बंडगार्डन पुलावरुन नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अबब! पुण्यातलं भारी रताळं; वजन ऐकाल तर थक्क व्हाल…
Pune News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने रस्त्यात अश्लील शेरेबाजी करून महिलेचा केला लैंगिक छळ