Hadapsar News | हडपसर, (पुणे) : तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही तर दुसरीकडे कोठे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार जून २०२२ ते ७ मे २०२३ दरम्यान घडला आहे.
परमेश्वर रमेश पात्रे (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे (वय २१, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जया पात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तर तिचे दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश देढे हा फिर्यादी यांच्या मुलीबरोबर लग्न करणार असल्याचे सांगत होता. तुम्हाला काय करायचे ते करा, जर तुम्ही मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही तर तिचे दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तो वारंवार देत होता.
दरम्यान, आरोपी पात्रे याच्या सततच्या धमक्यांमुळे रविवारी (ता. ०७) परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. धार्मिक कार्य पूर्ण केल्यानंतर आता फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Khadakwasla Dam | खडकवासला धरणात पोहायला गेल्या अन् जीव गमावून बसल्या,दोघींचे मृतदेह अखेर सापडले
Hadapsar Railway Station | हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी ; रेल्वे प्रवास होणार सुसाट