Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांडवगण फराटा येथे ४ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; उसाच्या शेतात विचित्र अवस्थेत सापडला मृतदेह

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 November 2024, 21:44
Leopard attacks on two ox in bhor pune

योगेश मारणे / न्हावरे : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरातील टेंभेकरवस्ती येथील घराच्या अंगणात खेळत असलेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवतेज समाधान टेंभेकर (वय-४ वर्षे, मु. रा. फराटेवाडी, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

 

ही घटना आज (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे नरभक्षक बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला करून फरफटत नेले. या घटनेने परिसरात भीतीचे वातवरण पसरले असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवतेज हा टेंभेकरवस्ती येथील घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी अचानक नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर चिमुकल्याला जवळच्या उसाच्या शेतात फरफटत नेले. त्यानंतर सुमारे दिड तासाने मुलाचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला.

या हल्यात मुलाचे धडापासून मुंडके वेगळे झाले आहे.  अशा अवस्थते मृतदेह सापडल्याने नागरीक आक्रमक झाले होते. दरम्यान, घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी आक्रमक होऊन वन विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

गोकुळनगर परिसरात १९ ऑक्टोबर रोजी वंश सिंग या मुलावर देखील बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेत त्याचाही मृत्यू झाला होता. या घटनेला एक महिना होत नाही तोच ही दुसरी घटना घडली आहे. वन विभागाला एक महिन्यात १४ पिंजाऱ्यांमध्ये एकही बिबट्या जेरबंद करण्यासाठी यश आलेले नाही, तसेच सुरुवातीला बिबट्याला जेरबंद करण्याठी वन विभागाला भक्ष्यच मिळाले नव्हते. त्यानंतर वन विभागाने अनेक प्रयत्न करूनही वन विभागाला एकही बिबट्या अद्यापपर्यंत पकडता आलेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ वन विभागाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14

उरुळी कांचन ग्रामपंचायत की वाढदिवसाचा ‘अड्डा’? ; खुर्च्या सदस्यांच्या, बसतायत भावी ‘पुढारी’..

Monday, 20 April 2026, 10:16
Next Post

जेजुरी येथील उद्योग, व्यवसाय सेवा संघटनेचा संजय जगताप यांना पाठिंबा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.