Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 April 2026, 11:29

लोणी काळभोर (पुणे), ता. 20 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालत भव्य महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता परिसरात जणू आरोग्य सेवेचा महाउत्सवच साजरा झाल्याचे चित्र दिसून आले. (Ambedkar Jayanti)

शनिवारी (ता.18) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत चाललेल्या या शिबिरात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांचे निदान करण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सहज उपलब्ध न होणाऱ्या अनेक आरोग्य सुविधांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. (Ambedkar Jayanti)

 

या महाआरोग्य शिबिरात वजन व उंची तपासणी, रक्तदाब (ब्लड प्रेशर), रक्तातील साखर (शुगर) तपासणी, महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी, नेत्र तपासणी तसेच गरजेनुसार ईसीजी सुविधा देण्यात आली. प्रत्येक रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर सल्ला देण्यात आला. तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या रक्तदान शिबिरात युवक-युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रतिसाद देत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. संघर्ष ग्रुप विश्वरत्न प्रतिष्ठान व समता प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याचा सन्मान करून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. त्यामुळे रक्तदात्यांचा उत्साह द्विगुणित झाला. (Ambedkar Jayanti)

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य दीपक आढाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “आंबेडकर जयंती ही केवळ उत्सव नसून समाजसेवेची प्रेरणा आहे,” हा संदेश त्यांनी कृतीतून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य आमोल टेकाळे, माजी उपसरपंच गणेश कांबळे, रिपाईचे रमेश गायकवाड यांच्यासह संदीप निकाळजे, आतिश काकडे, आनंद बनसोडे, मगर उडाणशिव, काळूराम कुंजीर, माऊली गायकवाड आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ambedkar Jayanti)

‘ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा’—आवाहनाला भरघोस प्रतिसाद
“ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा” या आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कदमवाकवस्ती व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिबिरात शिस्तबद्ध नियोजन, डॉक्टरांची उपलब्धता आणि स्वयंसेवकांची तत्पर सेवा यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. एकूणच, आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने समाजसेवेचा आदर्श घालून दिला असून, ग्रामीण भागात आरोग्य सेवेची नवी दिशा दाखवली आहे. (Ambedkar Jayanti)

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलन! पुणे विद्यापीठाकडून आंदोलनाला परवानगी; विद्यार्थ्यांसह हजारो लोकांचा सहभाग

Wednesday, 10 June 2026, 15:38

अनधिकृत बांधकाम पाडत नाही, फक्त अडीच लाख द्या; लाच घेताना सहाय्यक आयुक्त अडकले एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 10 June 2026, 15:27

पुणेकरांनो! डबल डेकर बस प्रकल्प लांबणीवर; ‘या’ अडथळ्यांमुळे घेतला निर्णय

Wednesday, 10 June 2026, 15:13

‘बायको आणि आई मला घरात येऊ देत नाही’ त्रासाला कंटाळून त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्…

Wednesday, 10 June 2026, 15:01

मेट्रो, बसने प्रवास करा अन् पगारात मिळवा वाढ; कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना

Wednesday, 10 June 2026, 14:57

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! ‘या’ ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

Wednesday, 10 June 2026, 14:24
Next Post

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.