Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्या पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलन! पुणे विद्यापीठाकडून आंदोलनाला परवानगी; विद्यार्थ्यांसह हजारो लोकांचा सहभाग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 15:38

पुणे : देशातील शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘कॉकरोच जनता पक्ष’ उद्या (11 जून) पुण्यात आंदोलन करणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून विद्यापीठ प्रशासनाने आवश्यक अटी आणि शर्तींसह परवानगी दिली आहे.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने आयोजकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजता विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर पक्षाचे हे दुसरे मोठे आंदोलन मानले जात आहे.

 

या आंदोलनात विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

यापूर्वी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पक्षाने पहिले आंदोलन केले होते. या आंदोलनात देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते. त्या वेळी शिक्षण सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता.

पुण्यातील आंदोलनातही वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविण्याची तयारी करण्यात आली आहे. आंदोलक कॉकरोचचे मुखवटे परिधान करून आणि हातात फुले घेऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी अभिजित दीपके यांनी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिस आणि प्रशासनाशी पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पुण्यातील या आंदोलनानंतर पक्षाच्या पुढील भूमिकेबाबत किंवा नव्या घोषणांबाबत अभिजित दीपके काय भूमिका मांडतात, याकडे विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

शिरूर तालुक्यात शेतातील वाद विकोपाला; निमगाव दुडे येथे मिरचीपूड फेकून शेतकरी कुटुंबावर दांडक्याने हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.