Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 July 2026, 19:00

फुरसुंगी, ता. ३ : विवाहानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव, गर्भपात करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ आणि पतीचे दुसऱ्या महिलेसोबत कथित प्रेमसंबंध यामुळे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आकाश रामदास शिंदे, सविता रामदास शिंदे, रामदास शिंदे आणि अजिंक्य रामदास शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वडकी येथील एका 22 वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२२ मध्ये फिर्यादी यांचा आकाश रामदास शिंदे याच्याशी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस गावी वास्तव्यानंतर दाम्पत्य हडपसर येथील उन्नतीनगर परिसरात राहू लागले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले, तरी पुढे शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि इतर कारणांवरून माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू झाला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, बी.कॉम.च्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असताना सासरच्या मंडळींकडून “तुझ्या शिक्षणाचा खर्च माहेरच्यांनीच करावा” असे सांगण्यात आले. त्यानंतर सातत्याने माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये आपण गरोदर असल्याची माहिती पतीला दिल्यानंतर त्याने “हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” असा दबाव टाकल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

त्यानंतर पती घर सोडून निघून गेला आणि त्याचा दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय निर्माण झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये पती घरी आल्यानंतर त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आल्याने विचारणा केल्यावर त्याने मारहाण करून मोबाईल फोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पतीने संबंधित महिलेशी संबंध ठेवणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही तो पुन्हा घर सोडून गेला आणि ज्योत्स्ना बाबासाहेब स्वामी नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून घरी परतण्यास नकार दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

 

दरम्यान, गरोदरपणातही सासरच्या मंडळींकडून हॉस्पिटलचा खर्च आणि घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी होत असल्याचे तसेच विरोध केल्यास शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचा आरोप आहे. मार्च २०२६ मध्ये सात महिन्यांची गरोदर असताना सासऱ्यांनी ढकलून दिल्याने आपण माहेरी परतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मे २०२६ मध्ये मुलगी झाल्यानंतरही पतीने “माझा तुझ्याशी आणि मुलीशी काहीही संबंध नाही” असे सांगितल्याचा, तसेच नंतर दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा दावा करून धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीच्या आधारे फुरसुंगी पोलिसांनी आकाश रामदास शिंदे, सविता रामदास शिंदे, रामदास शिंदे आणि अजिंक्य रामदास शिंदे यांच्याविरुद्ध विवाहितेचा छळ, मारहाण, पैशांची मागणी आणि अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp