Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 18:57

लोणी काळभोर, ता. ३ : शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका बहुराष्ट्रीय बँकेत कार्यरत प्रॉडक्ट इंजिनिअरची तब्बल १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला थोडा नफा खात्यात जमा करून विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेत अखेर बनावट ट्रेडिंग पोर्टल बंद करून संपर्कही तोडण्यात आला.

याप्रकरणी जयेश लहु पाटील (वय ४२, रा. मांजरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये फिर्यादीला फेसबुकवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरघोस नफा मिळवून देण्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना ‘Golden Path Forum 812’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले.

त्या ग्रुपमध्ये स्वतःला ‘TCS M-Group’ची फायनान्शियल अॅडव्हायझर ‘कॅथरीन ब्लेक’ म्हणून ओळख करून देणाऱ्या महिलेने शेअर मार्केट आणि आयपीओ ट्रेडिंगचे आकर्षक मार्गदर्शन सुरू केले. यानंतर फिर्यादीला एका बनावट ट्रेडिंग पोर्टलवर खाते उघडण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून ट्रेडिंग करण्यात आले आणि काही दिवसांत नफा दाखवून ५३ हजार ८०० रुपये परत मिळाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला.

 

यानंतर आरोपींनी मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने १६ लाख रुपये जमा करून घेतले. ट्रेडिंग पोर्टलवर तब्बल १ कोटी १३ लाख ९५ हजार ७१० रुपये शिल्लक आणि नफा दिसत असल्याने फिर्यादीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे काढण्यासाठी आधी ३० लाख रुपये अतिरिक्त भरण्याची अट घालण्यात आली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचे ट्रेडिंग खाते बंद केले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर ब्लॉक करून सर्व संभाषणही डिलीट करण्यात आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपचे अॅडमिन, स्वतःला फायनान्शियल अॅडव्हायझर म्हणवणारी महिला, बनावट ट्रेडिंग पोर्टलचे चालक आणि व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांच्या धारकांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आर्थिक फसवणुकीच्या या रॅकेटचा सखोल तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

"हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक," पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.