Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लंडनमधून फिरवतो पुण्याची सूत्र! ‘या’ ॲपवरून गुपचूप करायचा संपर्क; घायवळ बंधूंबद्दल धक्कादायक खुलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 14:24

पुणे : पोलिसांना चकवा देत परदेशात फरार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनमध्ये राहूनही पुण्यातील आपला कारभार सांभाळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्याचा भाऊ सचिन घायवळ याला अटक करण्यात आल्यानंतर तपासात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ हे आयफोनच्या फेसटाईम अॅपच्या माध्यमातून नियमित संपर्कात होते. निलेश घायवळ परदेशात असतानाही पुण्यातील घडामोडी, आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींवर तो भावाच्या माध्यमातून लक्ष ठेवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

निलेश घायवळ हा काही महिन्यांपूर्वी पासपोर्टवरील स्पेलिंगमधील तफावतीचा फायदा घेत देशाबाहेर पळून गेला होता. त्यानंतर तो लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्याच्या शोधासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही हालचाली करण्यात आल्या असून इंटरपोलमार्फत नोटीस जारी करण्यात आली होती.

दरम्यान, सुमारे नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन घायवळला पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेत पुण्यात आणले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोठडी वाढविण्याची मागणी केली आणि न्यायालयाने त्याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

 

तपासादरम्यान सचिन घायवळकडून चार मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि पाच पेनड्राइव्ह जप्त करण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू असून त्यातून निलेश घायवळच्या संपर्कांचे आणि व्यवहारांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या मते, निलेश घायवळ परदेशात असला तरी तो स्थानिक नेटवर्कच्या माध्यमातून पुण्यातील हालचालींवर नियंत्रण ठेवत होता का, याचा तपास सुरू आहे. तसेच त्याने गुन्हेगारी कारवायांचे नियोजन किंवा समन्वय परदेशातून केला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

सचिन घायवळविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि धमकी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीतून निलेश घायवळच्या हालचाली, आर्थिक व्यवहार आणि परदेशातून सुरू असलेल्या कथित संपर्क साखळीबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44
Next Post

मेट्रो, बसने प्रवास करा अन् पगारात मिळवा वाढ; कर्मचाऱ्यांसाठी नवी योजना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp