Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 3 September 2026, 18:19

दौंड: दौंड तालुक्यात राग आणि सुडाच्या भावनेतून एका निष्पाप चिमुकलीचा जीव घेतल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आईसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने चिमुकलीला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दौंड न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (५ सप्टेंबर) पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोरख रामसिंग वसावे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दौंड तालुक्यातील एका गावात आरोपीचा चिमुकलीच्या आईसोबत वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपीने चिमुकलीला विहिरीत ढकलून दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर यवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी गोरख वसावे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. आईसोबत झालेल्या वादातून चिमुकलीला विहिरीत ढकलल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

आरोपीला दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

 

दरम्यान, चिमुकलीच्या पार्थिवाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्ह्यातील मूळ गावी नेण्याचा निर्णय घेतला आहे.

या घटनेमुळे चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तब्बल चार दिवसांनंतर तिच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्षुल्लक वादाचा राग एका निष्पाप जीवावर काढल्याने या घटनेबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp