Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Idol | ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेचा जल्लोषात समारोप ; गाढवे, बेगमपल्ली, पाठक, पटेकर आदी ठरले विजेते..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 May 2023, 15:42

 Pune Idol | पुणे : कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ आयोजित ‘पुणे आयडॉल’ स्पर्धाची अंतिम फेरी रविवार (ता. १४) मे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे पार पडली. चार विभागात घेतल्या गेलेल्या स्पर्धेत राज्यभरातील ८१६ कलाकार सहभागी झाले होते. यातील ५४ कलाकारांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती.

दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांनी ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित सुरू केलेल्या या स्पर्धेचे हे वीसावे वर्ष होते.९ ते १४ मे अशी सहा दिवस ही स्पर्धा झाली. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या स्पर्धेला गायक, कलाकार व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी झालेल्या अंतिम स्पर्धेत संगीत, सूर, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी, जितेंद्र भुरूक, माजी नगरसेविका स्वाती निम्हण, बाळासाहेब बोडके, मुकारी अलगुडे, अमित गावडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गणेश घुले, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीन दांगट, जीएसटी अतिरिक्त आयुक्त सुनील काशीद -पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.

प्रास्ताविक आयोजक सनी निम्हण यांनी केले, तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व प्रवीण पोतदार यांनी केले. स्वागत उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी केले व आभार बिपीन मोदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनमाला कांबळे, किरण पाटील, रमेश भंडारी, तुषार भिसे अभिषेक परदेशी, कासिम तुर्क, नितेश दास, संजय माझिरे आदींनी परिश्रम घेतले.

 

यापुढे बोलताना आयोजक सनी निम्हण म्हणाले, “गायक, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. या अनुषंगाने चालू केलेल्या स्पर्धेला नागरिकांचा आणि कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संयोजक आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही स्पर्धा पुढेही सातत्याने चालू राहील. सर्व समावेशक स्पर्धा असल्याने राज्यभरातील कलाकार यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत.”

‘युवा आयडॉल’ प्रथम विजेती समृद्धी पटेकर म्हणाली, “पहिल्या दिवसापासून खूप चुरशीची स्पर्धा होती. अतिशय छान गाणाऱ्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम फेरी देखील खूप रंगली होती, स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंच दिला याबद्दल आभारी आहे”‌.

अंतिम फेरीमध्ये ठरलेले विजेते पुढीलप्रमाणे :

‘लिटिल चॅम्प’ प्रथम श्रेया गाढवे, द्वितीय तनय नाझीरकर.

‘ओल्ड इज गोल्ड’ प्रथम अब्दुल रजाक बेगमपल्ली, द्वितीय शशिकला वाखारे.

‘जनरल कॅटेगरी’ प्रथम पल्लवी पाठक, द्वितीय डॉ. तेजस गोखले. ‘युवा आयडॉल’ प्रथम समृद्धी पटेकर, द्वितीय संदीप दुबे.

दरम्यान, ‘उत्तेजनार्थ’ श्लोक जावीर, प्राजक्ता माने असे ‘पुणे आयडॉल’ २०२३ चे विजेते ठरले आहेत.

विजेत्यांना रोख रक्कम पंधरा हजार, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ रोख रक्कम पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Monday, 28 September 2026, 9:20

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

सोमवारपासून बँका बंद राहणार होत्या, पण रातोरात मोठा निर्णय! 3 दिवसांचा संप घेतला मागे

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11
Next Post

Hadapsar News | तरुणाच्या धमकीला घाबरून मुलीच्या वडिलांची आत्महत्या ; हडपसर परिसरातील घटना, एकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp