Good News | पुणे : यंदा महाराष्ट्रात मान्सून ८ जून च्या दरम्यान प्रवेश करणार असून संपूर्ण राज्यात २२ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
आणखी चार ते पाच दिवस तापमान वाढलेले…
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डख म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणखी चार ते पाच दिवस तापमान वाढलेले राहणार आहे. सुमारे ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पोहचणार आहे. हवामानामध्ये प्रचंड उकाडा वाढणार असल्याचे डख यावेळी म्हणाले.
उन्हाळ्याच्या कालावधीत मे महिन्यात पुन्हा एकदा ११ ते १६ मे दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. १७ मेनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल. यामुळे शेतकर्यांनी शेतीची कामे १६ मेपर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे डख यांनी शेतकर्यांना सांगितले.
मान्सूनचा पाऊस ८ जूनला महाराष्ट्रात दाखल…
दरम्यान, मान्सूनचा पाऊस ८ जूनला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. २२ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे. यानंतर २६ व २७ जूनला शेतकरी बांधवांनी खरिपाच्या पेरण्या कराव्या. जुनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येसुद्धा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज डख यांनी वर्तविला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Rain Update | काळजी मिटली ! यंदा पाऊस भरघोस पडणार ; डॉ. अनुपम कश्यपी
Rain Update | पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज ! येत्या ३-४ तासांत पावसाची हजेरी