भोर, (पुणे) Bhor News : बैलाच्या ऋनातून मुक्त होण्यासाठी भोर तालुक्यातील गवडी गावाच्या एका शेतकऱ्याने चक्क त्याचा तेराव्याचा विधी घातला आहे. (Bhor News) बाजीराव रामभाऊ साळुंके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. (Bhor News)
“पाखऱ्या” बैलाचे २७ एप्रिलला वृद्धपकाळाने निधन
भोर तालुक्यातील बाजीराव साळुंखे यांच्या या “पाखऱ्या” या बैलाचे २७ एप्रिलला वृद्धपकाळाने निधन झाले. त्याच्यासाठी काय करावे असा प्रश्न त्याच्या समोर होता. या शेतकऱ्याने माणसाचा जसा तेरावा घालतात त्याचप्रमाणे विधिवत तेरावा घातला आहे. या तेराव्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
भोर तालुक्यातील गवडी गावात राहणारे साळुंखे हे शेतकरी कुटुंब. त्यांनी १९९८ पासून स्वत:च्या मुलाप्रमाणे त्यांचा “पाखऱ्या” नावाचा बैलावर जीव होता. त्या बैलानेदेखील आपल्या शेतकरी असलेल्या मालकासोबत उन्हातान्हात काम केलं. गेली २५ वर्ष त्याने शेतकऱ्यांसोबत एकत्र काम केलं. शेवटी बैल वृद्ध झाला. त्याचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचा विधिवत तेरावा घातला आहे.
या दिवशी विधिवत पूजा करून संपूर्ण गावातल्या नागरिकांना तेराव्याचं जेवण घालण्यात आलं. यावेळी गावातील १३ बैलांना हार घालून त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घातला. इतकंच नाहीतर बैलांना मुरकी हा साज देण्यात आला. या तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता. त्यामुळे शेतकरी आणि त्याच्या बैलाच्या नात्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
पाखऱ्या या लाडक्या बैलाचा माणसांप्रमाणे तेरावा विधी केला. २५ वर्षे मुलाप्रमाणे संभाळलेल्या पाखऱ्या बैलाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. विधिवत पूजा करून, १३ बैलजोडींना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळी बैलांना खाऊ घातली. तसेच बैलांना मुरकी हा साज देण्यात आला. बैल मालकांना टॉवेल टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, तेराव्याला संपूर्ण गावाला पुरणपोळीचे गाव जेवण देण्यात आलं. तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते.परिसरात सध्या शेतकरी बाजीराव साळुंके आणि त्यांच्या बैलाच्या प्रेमाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल…