Accident | हडपसर, (पुणे) : फुरसुंगी कात्रज रोड मार्गावर एका भरधाव आयशरने २ चारचाकी व २ दुचाकी गाड्यांना धडक देत चौकातील छोट्या दुभाजकावर चढून पेट्रोल पंपाच्या दिशेने पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत टेम्पो चालक जखमी झाला असून सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरीद शेख (वय ३२ रा. औसा, लातूर) असं आयशर चालकाचं नाव आहे.
कात्रजच्या दिशेकडून येणारा हा आयशर दुभाजाकावर चढल्याचे पाहून समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारने दुचाकी सोडून पळ काढल्यामूळे तो वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथे आयशर प्लास्टिकचे दाणे घेऊन पुण्याकडून औसाकडे निघाला होता. टेम्पो मंतरवाडी परिसरात आला. मात्र, चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने दुचाकीला घासत चौकातील दुभाजकावर चढला आणि थेट पुढे जाऊन पेट्रोल पंपसमोर पलटी झाला. यामध्ये आयशरचे मागली चाके वाहनापासून मोकळी झाली आणि दुभाजकावर अडकली.
दरम्यान, आयशर दुभाजकावर चढल्याचं पाहून समोरून आलेल्या दुचाकी चालकाने गाडी सोडून पळ काढला. त्यामुळे दुचाकी चालक वाचला. चौकातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन आयशरमधील चालकाला सुखरूप बाहेर काढले. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, आयशरचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, कात्रज मंतरवाडी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Dive Ghat Accident | दिवे घाटात झालेल्या अपघातात बारामती व सासवड येथील दोघांचा मृत्यू
Accident News : राज ठाकरेंच्या सभेसाठी जाताना भीषण अपघातात मनसे सैनिकाचा मृत्यू ; तर २ जण जखमी