Blood Pressure | पुणे : सध्याच्या काळात हायब्लडप्रेशरचे रूग्ण वाढत आहेत. या आजाराची अशी काही लक्षणे दिसत नाहीत परंतु जेव्हा तो झाला आहे असं समजतो तेव्हा धक्काच बसतो. मात्र आहारात काही बदल केले तसेच ठराविक अन्नपदार्थांचा आहारात समावेश केला तर हायब्लडप्रेशर नियंत्रणात येऊ शकतो.
जाणून घ्या हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या अन्नपदार्थांचे सेवन करावे –
- आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या शरीरातील अतिरिक्त सोडिअमचे प्रमाण कमी करते.
- दह्यामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असते. तसेच दही रक्तदाबाची पातळी नियंत्रणात आणण्याचं काम करतं.
- केळ पोटॅशियमचे एक समृद्ध स्त्रोत आहे. त्यातील खनिजे रक्तदाबाच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभरात एक तरी केळ खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल.
- ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक तर फॅट्स कमी प्रमाणात असतात. ही पोषकतत्त्वे हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Healthy Tips | मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स ठरतील लाभदायक