Friday, April 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही, पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा; ‘असा’ बुक करता येणार आवडता क्रमांक, जाणून घ्या सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 26 November 2024, 13:41
report of khullar samiti accepted by

पुणे: नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहनधारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ‘द इंटिग्रेटेड सोल्युशन फॉर बुकिंग ऑफ रजिस्ट्रेशन मार्क ऑफ चॉईस’ ही ऑनलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

 

या सुविधेबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड, जि. पुणे येथे चाचणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविना) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून https:// fancy.parivahan.gov. in/ या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती ऑफलाईन पद्धतीने जारी करण्यात येईल, असे परिवहन विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

अर्जदाराने https:// fancy.parivahan. gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन न्यू युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ई-मेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग-इनमध्ये जाऊन ई-मेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग-इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाइन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई-पावतीची प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर) कडे नोंदणीसाठी द्यावी.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43

Pune News : भांबुर्डा येथील राखीव वनक्षेत्रात राडारोडा टाकणारे दोन डंपर जप्त ; अवैध कचरा टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले, वनविभागाची कारवाई

Friday, 24 April 2026, 16:28
Next Post
special drive for hospital checking by PMC Pune

पुणे महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे 'ओपन स्पेस'ची जागा ट्रस्टच्या ताब्यात; निर्णयाविरुद्ध अपील करणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.