Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 April 2026, 17:59

लोणी काळभोर, ता. 24 : जमिनीच्या वादातून कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाने महिलेला अश्लील शिवीगाळ, दमदाटी करून कुटुंबाला मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता.20) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चित्तरंजन त्रिंबक गायकवाड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची सुमारे 25 गुंठे वडिलोपार्जित जमीन असून, एकत्रिकरण प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे जमिनीच्या नोंदीत गोंधळ निर्माण झाला आहे. यासंदर्भात त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.

 

तक्रारदारांच्या शेजारील जमीनधारक चित्तरंजन गायकवाड व इतरांनी कथितपणे चुकीच्या फाळणी नकाशाच्या आधारे जमिनीची मोजणी करून घेतली आहे. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी शासकीय मोजणी सुरू असताना हा वाद चिघळला. तक्रारदार महिला शेतात काम करत असताना आरोपी घटनास्थळी आले आणि वादाच्या दरम्यान अश्लील शिवीगाळ करून अपमानित केले. यावेळी कुटुंबीयांनी विरोध केला असता, आरोपीने त्यांना उचकावण्याचा आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे.

इतकेच नव्हे, तर जमिनीवर जबरदस्तीने कंपाउंड टाकण्याचा प्रयत्न करत ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच “वीज कनेक्शन तोडून टाकू” अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे तक्रारदार महिला व त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले होते. त्यानंतर 20 एप्रिल 2026 रोजी पुन्हा आरोपी चित्तरंजन गायकवाड शेतात येऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. “तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला धडा शिकवू” अशा शब्दांत दमदाटी करून शिवीगाळ केली.

चित्तरंजन गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ केल्यामुळे पिडीता यांच्या स्त्री मनात लज्जा उत्पन्न झाली आहे. या प्रकरणी तक्रारदार महिलेने धैर्य दाखवत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून चित्तरंजन गायकवाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 79, 351(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव करत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18
Next Post
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच 'वाऱ्यावर' ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.