Saturday, April 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 24 April 2026, 18:13
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील उरुळी कांचन पोलीस ठाणे हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलातून वगळून या स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती मोठ्या थाटामाटात करण्यात आली. मात्र, आज दोन वर्षांनंतरही या पोलीस ठाण्याला स्वतःची हक्काची आणि पुरेशी जागा मिळालेली नाही. जागेअभावी पोलीस कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबना आता शिगेला पोहोचली असून, परिस्थिती इतकी गंभीर आहे की वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी चक्क बदलीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.

 

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा विस्तार मोठा आहे. येथे 1 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. याशिवाय महिला व पुरुष कर्मचारी असा एकूण 50 ते 60 जणांचा मोठा स्टाफ या ठिकाणी अहोरात्र कार्यरत असतो. मात्र, इतक्या मोठ्या स्टाफला बसण्यासाठी साधी सन्मानजनक जागाही उपलब्ध नाही. एकावर एक कागदपत्रांचे ढिगारे आणि अपुऱ्या जागेत दाटीवाटीने काम करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

आरोपींसाठी ‘जेल’ नाही, वाहनांसाठी ‘यार्ड’ नाही
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी या पोलीस ठाण्यात स्वतंत्र कोठडी (जेल) उपलब्ध नाही. त्यामुळे आरोपींना सांभाळताना पोलिसांची मोठी कसरत होते. त्यामुळे पोलिसांना यवत अथवा दौंड पोलीस ठाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. अपघातातील जप्त केलेली वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने ही वाहने उघड्यावर अस्ताव्यस्त पडून आहेत. या विदारक चित्रामुळे पोलीस ठाणे आहे की भंगारवाडा? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

बदलीसाठी अर्जांचा पाऊस
काम करण्याच्या ठिकाणची ही दुरवस्था पाहून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अनेक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी आता येथून पाय काढण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचाऱ्यांनी “बसायला जागा नाही आणि सुविधा नाहीत, अशा ठिकाणी काम कसे करायचे?”असा सवाल करत बदलीसाठी वरिष्ठ पातळीवर अर्ज दिले आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे झाले तरी सुविधांच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने, गृह विभाग आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल उरुळी कांचनची जनता आणि येथील त्रस्त पोलीस विचारत आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

 

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सहकार मंत्र्यांचा मोठा निर्णय! भीमा-पाटसच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

Friday, 24 April 2026, 20:39

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

Friday, 24 April 2026, 18:40
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात जागेअभावी पोलीसच ‘वाऱ्यावर’ ; आरोपींसाठी जेल नाही, कर्मचाऱ्यांना बसायला जागा नाही ; त्रस्त पोलिसांनी धरला बदलीचा रस्ता..

Friday, 24 April 2026, 18:13

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीच्या माजी सरपंचाकडून महिलेला अश्लील शिवीगाळ करून कुटुंबाला दिली मारण्याची धमकी

Friday, 24 April 2026, 17:59

उरुळी कांचनमध्ये ‘रॉंग साईड’ने येणाऱ्या टेम्पोची वृद्धाला पाठीमागून धडक ; उपचारादरम्यान मृत्यू ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 17:20
Pune Crime: Brother-in-law attacked with "cement gattu" after saying he would not send his sister! Brother-in-law and brother-in-law clash over going to visit their in-laws; Both seriously injured

Shikrapur News : तळेगाव ढमढेरे येथे यात्रेच्या फ्लेक्सवरून जगताप आणि घुले गटात तुंबळ हाणामारी ; शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Friday, 24 April 2026, 16:43
Next Post

Pune Solapur Road : केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री, २ राज्यमंत्री, ३ खासदार आणि ५ आमदारांचे राजकीय वजन असतानाही पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीकडे कानाडोळा!”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.