Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 4 September 2026, 21:53

यवत : शेतात बसलेल्या एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला “मावशी, साप आला” अशी भीती दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पसार झालेल्या भामट्यांचा छडा यवत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून चोरीला गेलेले 6 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सुमित उर्फ घा-या ईश्वर साळुंखे (वय 19, रा. बोरीपार्धी, ता. दौंड,) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 09 ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दापोडी (ता. दौंड) गावच्या हद्दीतील शेतात सुनंदा बापू रूपनवर (वय 65) या ऊस पिकाची लागवड करून झाडाखाली विश्रांतीसाठी बसल्या होत्या. त्याच वेळी आरोपी सुमित उर्फ घा-या साळुंखे हा आपल्या दोन अनोळखी साथीदारांसह होंडा शाईन दुचाकीवरून तेथे आला.

त्यातील दोघांनी आजींजवळ जाऊन “मावशी, साप आला!” असे मोठ्याने सांगून त्यांना प्रचंड घाबरवले. भीतीपोटी सुनंदा रूपनवर पळू लागल्या असता, तिन्ही भामट्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व काळ्या मण्यांची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि दुचाकीवरून सुसाट पसार झाले. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कसून तपास सुरू केला. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपी सुमित उर्फ घा-या साळुंखे याला बोरीपार्धी येथून ताब्यात घेतले.

 

दरम्यान, त्याच्याकडून पोलिसांनी दुचकिसह चोरीला गेलेल्या मुद्देमालासह 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने वृद्ध महिला सुनंदा रूपनवर यांनी भावूक होऊन यवत पोलिसांचे मनापासून आभार मानले.

उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू…

या गुन्ह्यातील इतर दोन अनोळखी पसार आरोपींचा यवत पोलीस गांभीर्याने शोध घेत आहेत. सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मैतलवाड, पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर, अमोल काळे, पोलीस शिपाई धीरज जाधव, अमोल भुजबळ, सचिन गुंड, प्रतीक धीवार, प्रतीक जगताप, विकास मोरे, दिनेश लोणकर व विनीत कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ! कॉन्स्टेबल बेपत्ता झाल्याने शोधमोहीम; 3 दिवसांनी बस डेपोत मृतदेह सापडला अन्…

Saturday, 26 September 2026, 17:09

दुष्काळ जाहीर करून काय उपयोग? वडेट्टीवार संतापले ; ही तर शेतकऱ्यांची फसवणूक….,सरकारकडे मांडल्या थेट मागण्या

Saturday, 26 September 2026, 16:35

मनोज जरांगेंना मोठा धक्का! अंतरवाली सराटीतून उपोषणाचा मंडप रातोरात हटवला; नेमकं काय घडलं?

Saturday, 26 September 2026, 16:07

MPSC पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं! रोहित पवारांनी स्क्रीनशॉट दाखवत केला गंभीर आरोप,प्रकरणाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 15:43

1 गुणाची आघाडी अन् शेवटच्या 8 मिनिटांत थरार! भारताच्या वाघिणींनी इराणला हरवलं; चौथ्या सुवर्णावर मोहोर!

Saturday, 26 September 2026, 15:23

जरांगे पुन्हा मैदानात! रुग्णालयातून मोठी घोषणा; आता थेट मुंबईकडे मोर्चा…..,फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार?

Saturday, 26 September 2026, 14:56
Next Post

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp