Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरमधील अनिल पवार हत्या प्रकरणाचा महत्वपूर्ण निकाल; आरोपी बापू बाबरला जन्मठेप

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 22:17

पुणे : हडपसर परिसरात लोखंडी हातोडी आणि दगडाने मारहाण करून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बापू पांडुरंग बाबर (वय ४५) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ३ मध्ये सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर २०२६) या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.

या प्रकरणात अनिल दादा पवार (वय ३४, रा. काळेपडळ, हडपसर) यांची हत्या झाली होती. २९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चहाची टपरी बंद करून घरी गेलेले फिर्यादी आकाश बन्सी सरोदे यांचे वडील दुसऱ्या दिवशी सकाळी टपरी उघडण्यासाठी आले होते. त्यावेळी ३० डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास टपरीपासून सुमारे ५० फूट अंतरावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलाला याबाबत फोनवरून माहिती दिली.

आकाश सरोदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर जखमा दिसून आल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेली लोखंडी हातोडीही आढळली. पोलिसांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. खिशात सापडलेल्या आधारकार्ड आणि वाहनचालक परवान्याच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख अनिल पवार अशी पटली.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८०/२०२० नोंदवण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे संतोषकुमार पताळे आणि अनिलकुमार वर्मा यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी तपास केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस पथकाने सहकार्य केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

२०२७ मध्ये सोनं ३ लाखांवर पोहोचणार? बाबा वंगा यांच्या धक्कादायक भविष्यवाणीने खळबळ; नेमकं सत्य काय?

Sunday, 15 November 2026, 18:08

न्हावरे-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात! बसचा टायर फुटल्याने लक्झरी बस आयशरला धडकली; दोन्ही चालक गंभीर जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!

Sunday, 15 November 2026, 17:56

पुणे पोलीस दलात खळबळ! ३० लाखांच्या जबरी चोरीप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड

Sunday, 15 November 2026, 17:29

सोरतापवाडी येथे दिवाळीसाठी मावशीकडे आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू; वाघोली अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला

Sunday, 15 November 2026, 16:30

नाव आणि फोटोचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई; रुपाली चाकणकर यांचा स्पष्ट इशारा!

Sunday, 15 November 2026, 16:29

पंढरपुरात भयंकर दुर्घटना! ३० फूट खोल विहिरीचे काम सुरू असताना कोसळला दगड-मातीचा ढिगारा; चार कामगार अडकल्याची भीती

Sunday, 15 November 2026, 16:09
Next Post

Daily Horoscope: दसऱ्याचा दिवस कोणासाठी ठरणार गेमचेंजर? मेष ते मीन, जाणून घ्या 12 राशींचं भविष्य!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp