Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी दिलासा! पहिला हप्ता ३,५०१ रुपये प्रतिटन; संचालक मंडळाचा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 21:50

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ५०१ रुपये पहिला हप्ता एकरकमी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर आणि संचालक मंडळाने ही माहिती दिली. सोमवारी, १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे चालवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांनी चालू हंगामातील आपला संपूर्ण ऊस श्री छत्रपती कारखान्याला द्यावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

चालू गळीत हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी कारखान्याने ‘हजार किलोचाच टन, वजन चोख, पैसे रोख, छत्रपतीला ऊस घाला बिनधोक’ अशी नवी टॅगलाइन तयार केली आहे. कारखान्याचे वजनकाटे अचूक असून सभासद आणि गेटकेनच्या शेतकऱ्यांना समान दर दिला जात असल्याचे संचालक मंडळाने स्पष्ट केले.

ऊस गाळपातही कारखान्याने चांगली कामगिरी केली आहे. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी एका दिवसात ८ हजार ६५० टन उसाचे गाळप करण्यात आले. तर आठ दिवसांत एकूण ४७ हजार २१० टन गाळपाचा टप्पा पूर्ण झाला आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, कारखान्यातील कामगारांसाठी १५ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाचा सुमारे ८५० कामगारांना लाभ मिळणार आहे. बोनसपैकी १० टक्के रक्कम दिवाळीपूर्वी, तर उर्वरित ५ टक्के रक्कम मकरसंक्रांतीला कामगारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

छत्रपती कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीपूर्वी दिलासा! पहिला हप्ता ३,५०१ रुपये प्रतिटन; संचालक मंडळाचा निर्णय

Monday, 19 October 2026, 21:50

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp