Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 19:51

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी काँग्रेसप्रणित आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीकडे तीन कॅबिनेट मंत्री, दहा आमदार आणि दोन खासदारांचे पाठबळ असतानाही या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले. महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून सतेज पाटील यांनी प्रचाराची सूत्रे स्वतःकडे ठेवत निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी विजयासाठी प्रयत्न केले असले, तरी निकालात सतेज पाटील यांच्या आघाडीने बाजी मारली.

या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनाही पराभवाचा धक्का बसला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र, मतदारांनी विरोधी आघाडीला कौल दिला. गोकुळमधील दीर्घकाळ प्रभाव असलेले अरुण डोंबळे आणि विश्वास आबाजी पाटील यांनाही पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपूर्वी मतदारांवर दबाव टाकल्याच्या आरोपांमुळेही ही निवडणूक चर्चेत राहिली होती.

गोकुळच्या निवडणुकीला यंदा मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले होते. पात्र मतदारांच्या यादीवरून निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. यापूर्वी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यंदा पक्षीय राजकारणाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. महायुतीकडून विजयाचे दावे केले जात असतानाच प्रत्यक्ष निकालात सतेज पाटील यांच्या आघाडीने आघाडी घेतली. या निकालामुळे कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघावरील वर्चस्वासाठीची लढाई पुन्हा चर्चेत आली आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25
Next Post

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp