Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 23 October 2026, 19:59

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंड्याच्या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. लग्नात सोन्याची चैन दिली नाही आणि चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत, या कारणावरून पतीसह सासरच्या पाच जणांनी छळ केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर पीडितेचे वजन जास्त असल्याचे सांगून तिला घरातील कष्टाची कामे करण्यास भाग पाडले जात होते. सततच्या त्रासामुळे तिचा गर्भपात झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती सुमित अशोक मगरे (वय ३२, व्यवसाय शिक्षक), सासू विजया मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी अजय बनसोडे आणि दीर प्रशांत मगरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरमधील न्यू नंदनवन कॉलनी परिसरातील रहिवासी आहेत. पीडित २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

फिर्यादीनुसार, पीडिता आणि सुमित यांचा विवाह ५ एप्रिल २०२६ रोजी सावंगी येथील एका लॉनमध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांतच सोन्याची चैन दिली नसल्याच्या कारणावरून तिला टोमणे मारण्यास आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. संसार टिकावा म्हणून पीडितेच्या वडिलांनी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सासरी जाऊन जावयाला सोन्याची चैन दिली. तरीही सासरच्या मंडळींचा त्रास थांबला नसल्याचा आरोप आहे.

१४ जून २०२६ रोजी सासरच्या मंडळींनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणले नाहीत तर सुमितचे दुसरे लग्न लावून देऊ आणि घराबाहेर काढू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी सासू, नणंद आणि दीर यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचाही आरोप आहे.

 

पीडितेचे वजन जास्त असल्याचे सांगून तिला घरातील फरशी पुसणे, झाडलोट करणे आणि दगडावर कपडे धुणे यांसारखी कष्टाची कामे करण्यास भाग पाडले जात होते, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच तिला जाणीवपूर्वक कमी जेवण दिले जात असल्याचाही आरोप आहे. या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे पीडितेची प्रकृती बिघडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पीडिता गर्भवती असतानाही उपचार आणि सोनोग्राफीसाठी नेण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप आहे. २३ ऑगस्ट २०२६ रोजी तिचा गर्भपात झाला. त्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तिला गंभीर त्रासामुळे ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

गर्भपातानंतर सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा नांदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. माहेरच्या लोकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी छावणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59

अग्निवीरांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्रात २८२ माजी नौदल अग्निवीरांना थेट पोलिस सेवेत संधी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Friday, 23 October 2026, 19:07

अन् तो गर्लफ्रेंडच्या मृतदेहाजवळ बसून २ तास रडला! पहिले खून नंतर पश्चाताप; तिच्या वागण्याला कंटाळून त्यानं गळा आवळला; तिच्या छातीवर दगड…

Friday, 23 October 2026, 18:56

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला धक्कादायक वळण! जीवाभावाचे तीन मित्रच संशयाच्या भोवऱ्यात; दौंडच्या ढाब्यावर २ लाखांची सुपारी दिल्याचा संशय; हल्ल्यानंतर रुग्णालयातही मित्रांची उपस्थिती, आतापर्यंत ५ जणांना अटक

Friday, 23 October 2026, 18:47

प्रतिक्षा संपली! PM किसानच्या हफ्त्याची तारीख जाहीर ; दिवाळीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹ 2000 जमा होणार?

Friday, 23 October 2026, 18:08

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्वाची अपडेट! सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्तीयांना धडाधड नोटिसा,चौकशी होणार?

Friday, 23 October 2026, 17:48
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp