Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 23 October 2026, 20:50

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी फटाक्यांची विक्री आणि वापराबाबत कडक नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांची सुरक्षा, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

नियमावलीनुसार, सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करता येणार नाही. विदेशी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त फटाके विक्रीसाठी ६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत तात्पुरते परवाने दिले जाणार आहेत. परवान्याची मुदत संपल्यानंतर विक्रेत्यांना फटाक्यांची विक्री करता येणार नाही. विक्री न झालेला शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे जमा करणे बंधनकारक राहणार आहे.

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यांच्या आवाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. फटाके फोडण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर करण्यास बंदी आहे. तसेच १०० पेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर आणि विशिष्ट प्रकारच्या अॅटमबॉम्बवरही कायदेशीर निर्बंध लागू राहतील.

 

ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडता येणार नाहीत. नियमांच्या अधीन राहून कमी आवाजाचे प्रकाश व रंगांची आतषबाजी करणारे फटाके आणि पर्यावरणपूरक ग्रीन फटाके वापरण्यास मुभा असेल. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या सभोवतालचा १०० मीटर परिसर शांतता क्षेत्र असल्याने या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई असेल.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59

अग्निवीरांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्रात २८२ माजी नौदल अग्निवीरांना थेट पोलिस सेवेत संधी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Friday, 23 October 2026, 19:07

अन् तो गर्लफ्रेंडच्या मृतदेहाजवळ बसून २ तास रडला! पहिले खून नंतर पश्चाताप; तिच्या वागण्याला कंटाळून त्यानं गळा आवळला; तिच्या छातीवर दगड…

Friday, 23 October 2026, 18:56
Next Post

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp