Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 23 October 2026, 21:31

न्हावरे: मुलगा होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करणे, पैशांची मागणी करून दमदाटी करणे, तसेच मुलीला हिसकावून घेऊन घराबाहेर काढल्याच्या आरोपावरून आंबळे (ता.शिरूर) येथील विवाहित महिलेच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विवाहिता गायत्री विकी पवार (वय २५, रा.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार विवाहितेचा पती विकी रामदास पवार (वय २८), सासू मीना रामदास पवार (वय ५५), दीर किरण रामदास पवार (वय ३३), जाऊ शिवानी किरण पवार (वय २७) आणि नणंद निलम विजय साळुंके (वय ३०, सर्व रा.आंबळे, ता.शिरूर, जि.पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गायत्री पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे,असा आरोप केला आहे. तसेच मुलगा होत नसल्याच्या कारणावरून वारंवार बोलताना टोमणे मारून त्रास दिला जात आहे. तसेच पीडित विवाहितेच्या मुलीला हिसकावून घेण्याची आणि पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी सासरच्या मंडळीकडून केली दिली जात होती. अशी तक्रार पीडित विवाहितेने केली आहे.

दरम्यानच्या काळात पती विकी पवार याने नवीन चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणावेत, अशीही मागणी करण्यात आल्याचा आरोपही गायत्री पवार यांनी केला आहे. त्यामुळे या आर्थिक मागणीवरूनही छळ करण्यात आला होता, अशीही तक्रार गायत्री पवार यांनी केली आहे.

 

याशिवाय, पतीच्या मनाविरुद्ध यापूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा राग मनात धरून पीडित गायत्री यांना एका मुलीला भेटून तिला मारहाण करण्यास सांगण्यात आल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. मात्र, गायत्री पवार यांनी यास नकार दिल्यानंतर त्यांची मुलगी शर्वरी हिला त्यांच्यापासून हिसकावून घेण्यात आले आणि गायत्री पवार यांना घराबाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp