Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 September 2026, 21:27

यवत : गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त करून चालकासह मंडळावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिला आहे .गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांची बैठक यवत येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, यावेळी पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी गणेश उत्सवाबाबत मार्गदर्शन केले.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष यांसह डीजे मालकावर कडक कारवाई केली जाईल तसेच गणपती मंडपामध्ये पत्ते खेळणाऱ्या मंडळावर देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या बैठकीत दिला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम यांनी उपस्थित मंडळाच्या पदाधिकारी यांचे स्वागत करत प्रास्ताविक करत गणेश उत्सव साजरा करत असताना लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना देखील या उत्साहात सहभागी होता आले पाहिजे अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी गणेश मंडळांनी संबंधित विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे, परवानगी बाबत पोलिस प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल. मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, गणपतीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सीसीटीव्ही लावावे, गणपती मूर्ती जवळ 24 तास कार्यकर्ते ठेवणे, गणपती उत्सव काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट कोणीही करू नये याबाबत काहीही माहिती असल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला कळवावे.

तसेच वर्गणी गोळा करताना जबरदस्ती करण्यात येऊ नये, जिवंत देखावे सादर करताना सामाजिक व इतरांची कोणतीही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी, आगमन व विसर्जन मिरवणुकीत शस्त्र व ज्वलनशील वस्तू बाळगू नयेत, मिरवणूक दिलेल्या मार्गानेच जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.

 

ऐनवेळी मिरवणूक मार्गात बदल करण्यात येऊ नये, इतर धर्मांच्या धार्मिक स्थळी मिरवणूक शांततेत शांततेत पार पाडावी , विसर्जन ठिकाणी आवश्यक सर्व काळजी घेण्यात यावी , वीजचोरी करून उत्सव साजरा करू नये. विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन कोणीही सहभागी होणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी.

डीजे, साऊंड सिस्टिम वापरताना ध्वनी मर्यादा ओलांडल्यास व मंडपामध्ये पत्ते खेळताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला असून रक्तदान, आरोग्य शिबिर यासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करत यवत पोलीस स्टेशन हद्दीत सर्वत्र गणेश उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन केले.

यावेळी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावातील पोलिस पाटील , गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52
Next Post

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp