Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 September 2026, 18:52

आदित्य बोराटे –

इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर) येथे हुंड्याच्या मागणीवरून शारीरिक व मानसिक छळ झाल्याने पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची फिर्याद इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी मयत सोनालीच्या पतीसह सासऱ्याला इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे.

सोनाली समाधान चंदनशीवे (वय 21, रा. वडापुरी, ता. इंदापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील हनुमंत श्रीपती बनसोडे (वय 45, रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

एक लाख रुपयांच्या मागणीचा आरोप

 

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, सोनाली हिच्याकडे माहेरहून एक लाख रुपये हुंडा आणण्याची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम आणण्यासाठी पती, सासू आणि सासरे यांनी तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सोनाली पाच महिन्यांची गर्भवती असतानाही तिचा कथित छळ सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या छळाला कंटाळून सोनालीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.

या प्रकरणी समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशीवे, पार्वती गौतम चंदनशीवे आणि गौतम नामदेव चंदनशीवे (सर्व रा. वडापुरी, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 80(2), 108 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदापूर पोलिसांनी कारवाई करत मयत सोनालीचा पती समाधान उर्फ कार्तिक चंदनशीवे आणि सासरा गौतम नामदेव चंदनशीवे यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर 2025 ते 3 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत वडापुरी येथील सासरच्या घरी सोनाली हिचा कथित छळ झाल्याचे नमूद आहे. गुरुवारी (दि. 3) सायंकाळी 6.35 वाजता इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस उपनिरीक्षक सुरवसे यांनी केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38

सासवड येथे वकिलावर हल्ला, पत्नीचा विनयभंग! रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून वाद; पुणे आणि सासवड बार असोसिएशनकडून घटनेचा निषेध

Friday, 25 September 2026, 20:01

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03
Next Post

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp