Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 15:17

पुणे: पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत संभाव्य दरोड्याचा कट उधळून लावला आहे. रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले. त्यांच्या ताब्यातून शस्त्रे, महागडे मोबाईल, डिजिटल घड्याळे आणि वाहनांसह एकूण 11 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी पहाटे कामशेत पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्त घालत असताना सहारा कॉलनीजवळील मोकळ्या जागेत दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. पोलिसांचे वाहन पाहताच त्यांनी दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांची नावे एकनाथ कृष्णा रोकडे (वय 28) आणि संकेत बाबू माने (वय 32, दोघेही रा. मानखुर्द, मुंबई) अशी आहेत. तपासादरम्यान त्यांच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर ओळख लपवण्यासाठी कापड बांधलेले आढळले.

आरोपींची झडती घेतली असता विनापरवाना धारदार कोयता, चाकू, कटर, लोखंडी रॉड, दोरखंड, मिरचीपूड तसेच अनेक महागडे मोबाईल फोन आणि डिजिटल घड्याळे आढळून आली. या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

 

पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र राऊळ यांच्या फिर्यादीवरून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी आणखी तीन साथीदारांसह परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे. तसेच या आरोपींचा यापूर्वीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59
Next Post

'आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही'; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp