Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 7 June 2026, 16:57

उरुळी कांचन, (पुणे) : केडगाव येथील ‘लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटल’मध्ये कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नसताना आणि स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही, गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदेशीर साठा करून गर्भपात केला जात असल्याचा खळबळजनक पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी केडगाव येथील एका महिला डॉक्टरवर तर उरुळी कांचन येथील एका डॉक्टरवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. सचिन विठ्ठल गुजर, (वय 40, व्यवसाय नोकरी, वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्नालय, दौंड), यांनी यवत पोलीस्त ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डॉ. तुकाराम यशवंत मोटे, माहेर हॉस्पिटल शिवकृपा मार्केट शेजारी रा. उरुळी कांचन, ता. हवेली) व डॉ. स्वाती लवंगारे (पुर्ण नाव माहित नाही लवंगारे मॅटर्निटी अँन्ड इन्फर्टिलीटी हॉस्पिटल, केडगाव, ता. दौंड) रा. केडगाव ता. दौंड जि. पुणे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. केडगाव येथील लवंगारे हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ नसताना चालणाऱ्या या काळ्या धंद्याला उरुळी कांचन येथील ‘माहेर हॉस्पिटल’चे डॉ. तुकाराम मोटे हे गर्भपाताच्या गोळ्या पुरवून पाठबळ देत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. सचिन गुजर यांना केडगाव येथील लवंगारे हॉस्पिटलमध्ये अवैध कृत्य सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार शासकीय पथकाने शनिवारी (ता. 06) दुपारी ठीक पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास ‘लवंगारे हॉस्पिटल’ येथे अचानक धाड टाकली.

 

या हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टर डॉ. स्वाती लवंगारे ह्या अधिकृत स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत, तसेच त्यांना वैद्यकीय कायद्यानुसार गर्भपात करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठा बेकायदेशीररित्या करून ठेवला होता आणि त्याद्वारे त्या महिलांचे अवैध गर्भपात करत असल्याचे रंगेहात उघड झाले.

या गुन्ह्याचा तपास करत असताना या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या रुग्णांना पुरवण्यामागे उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम यशवंत मोटे यांचा मुख्य हात असल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटलमधील अधिकृत रेकॉर्ड आणि मेडिकल रजिस्टर तपासले असता, डॉ. तुकाराम मोटे यांच्या नावाने व सहीने या गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्या गेल्याची स्पष्ट नोंद आढळून आली आहे.

दरम्यान, डॉ. स्वाती लवंगारे व डॉ. तुकाराम यशवंत मोटे यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.