Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 17:20

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुण-तरुणींची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून खराडी पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकासह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, Radiant Edutech LLP या कंपनीचे मालक सैफ वाहिद मनियार (वय 31), एक्झिक्युटिव्ह मॅनेजर समीत सुराणा, फायनान्स मॅनेजर वैभव दुबेवार, गीतेश कुंबलकर (वय 25) आणि इतर संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जून 2025 ते 30 मार्च 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपींनी बेरोजगार तरुणांना मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत कंपनीत नोंदणी करण्यास सांगितले. त्यासाठी उमेदवारांकडून हजारो रुपयांची फी आकारण्यात आली. तक्रारदार तरुणीकडून सुमारे 1 लाख 90 हजार रुपये घेण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच इतर अनेक उमेदवारांकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, उमेदवारांचा विश्वास जिंकण्यासाठी सुरुवातीला त्यांना काम दिल्याचे भासवण्यात आले. इतकेच नव्हे तर काही जणांच्या खात्यात तीन महिन्यांचा पगारही जमा करण्यात आला. त्यामुळे उमेदवारांचा कंपनीवर विश्वास बसला. मात्र, नंतर अचानक पगार देणे बंद करण्यात आले आणि कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासनही पूर्ण करण्यात आले नाही.

 

फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक तपासात या प्रकरणात एकूण 43 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच नोकरीच्या आमिषाने पैसे मागणाऱ्या अनधिकृत संस्था किंवा एजन्सींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

Saturday, 29 August 2026, 19:20
Next Post

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp